आनंदवार्ता: जिल्ह्यातील आणखी 4 रुग्ण आता कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 :-  पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून ०४ जणांचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या रुग्णासह २४ रुग्णांना … Read more

लॉकडाऊन मध्ये माजीमंत्री राम शिंदे करत आहेत ही कामे

जामखेड – माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या मूळ गावी चौंडी येथील घरी आहेत. तसेच दूरध्वनीवरून गरजूंना रेशनचे धान्य मिळण्यासाठी, तसेच उद्‌भवलेल्या परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आहेत. तसेच आपला वाचन, बागकामाचा छंदही जोपासत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे चौंडी येथील निवासस्थानी वडील शंकरराव, आई भामाबाई, पत्नी आशाबाई, मुली अक्षता … Read more

अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून देऊन त्यांची क्रूर हत्या

जळगाव :- जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून देऊन त्यांची क्रूर हत्या केल्याची घटना येथे घडली असून, पित्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पित्याविरुद्ध पिंपळगाव (हरे.) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विकास सुरेश ढाकरे (तेली) हे दि. २२ रोजी सकाळी ७:३० वाजता आपल्या तनुश्री … Read more

अहमदनगरच्या ‘या’ मुलीने असे संशोधन केले कि अवघ्या पंधरा मिनिटातच होईल तुमची कोरोना टेस्ट !

अहमदनगर Live24 : जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’ची निर्मिती अकोले तालुक्यातील एका मुलीने बनविली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्याकडूनही मान्यता मिळाली आहे. शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी … Read more

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

चांगली बातमी : ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीदेशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत तर १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सरकारने दिली. बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढून १९.८० टक्के झाल्याचे सांगत सरकारने संसर्गाचा वेग स्थिर ठेवण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. बुधवारी देशव्यापी लॉकडाऊनला एका महिना पूर्ण झाला … Read more

निराधारांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यांतर्गत राज्यातील जवळपास ३५ … Read more

जामखेडला हॉटस्पॉट घोषित केल्याने आ.रोहित पवार यांनी केले हे काम

जामखेड : विविध प्रश्नांसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आढावा घेतला. मतदारसंघात असलेल्या अनेक प्रश्नांवर आ.पवार यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सुचनाही केल्या. यावेळी आ.पवार यांनी कर्जत येथील काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. कोणत्याही व्यक्तीवर धान्य वाटपात अन्याय होणार नाही, शासनाच्या निकषानुसारच धान्याचे वाटपाच्या सुचना केल्या. ज्यांच्याकडे … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

कोपरगाव : शहरातील सुभाषनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मुजाहिद मज्जीद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सुभाषनगर येथील आरोपी योगेश संजय शिंदे, संजय रामभाऊ … Read more

मॉर्निंग वॉकला गेले आणि दंड भरून आले ….

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे शिर्डी पोलीस … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : केंद्रीय राखीव दलाच्या जवानास मारहाण

पाथर्डी : माळीबाभुळगाव शिवारातील शिक्षक कॉलनी येथे केंद्रीय राखीव दलातील जवान मच्छद्रिं चंद्रकांत बडे यांना चौघांनी मारहान करुन गंभीर जखमी केले आहे. बुधवारी कॉलनीत झालेल्या या मारामारीमुळे जिल्हा पोलिस दल चांगलेच कामाला लागले आहे. पाथर्डीत गोळीबार झाल्याची चर्चा सोशल मिडीयातून सुरु झाली आणि जो-तो कोरोना विसरुन केवळ गोळीबाराची चौकशी करीत होता. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, … Read more

…म्हणून ‘या’ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही !

कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे. तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे यांची माजी आमदार कर्डिले यांच्यावर नाव न घेता टीका म्हणाले ….

राहुरी :- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येर्णा­या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे ६८० एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून, यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरीचारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही. मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे … Read more

शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडतोय

अहमदनगर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. देशभरात सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊन झाले आहे. तसेच … Read more

जिल्हा बॅँकेची बदनामी केली तर ….वाचा काय म्हणतात बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर

अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत. बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील … Read more

पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या असा झाला पसार बातमी वाहून तुम्हालाही बसेल धक्का …

संगमनेर : तालुक्यातील अकलापूर येथील भोरमळा येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या गज वाकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकलापूर शिवारातील भोरमळा याठिकाणी तेजस मधे यांनी प्रताप भोर यांची शेती वाट्याने केली आहे. शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान ते कांद्याला पाणी भरत होते. यावेळी त्यांच्या जवळ … Read more

धक्कादायक …आता दोन मांजरींना झालीय कोरोनाची लागण !

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील दोन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्राण्यांना कोरोना होण्याचे हे अमेरिकेतील पहिलेच प्रकरण आहे. जगात पाळीव प्राण्यांना कोरोना झाल्याच्या फार तुरळक घटना समोर आल्या आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी तर मानवामुळे कुत्रे, मांजरींना कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा केला आहे. मानवामुळे एखाद्या श्वानाला कोरोनाचा संसर्ग झाला तरी कोरोनाग्रस्त श्वानामुळे … Read more

वाटसरू महिलेची सुखरुप प्रसूती

खरवंडी : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूती केल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली येथून वागत (जि. यवतमाळ) पायी जात असताना वडाळा बहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचे दुखःद निधन

जामखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप पाटील (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले. पाटील यांची तालुक्यात ओळख आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होती, जवळा जिल्हापरिषद गटात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात. पक्षाच्या विवध पदांवर काम करत असतानाच पाटील यांनी जवळा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी, ‘जामखेड तालुका … Read more