वाटसरू महिलेची सुखरुप प्रसूती

खरवंडी : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूती केल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेचा सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली येथून वागत (जि. यवतमाळ) पायी जात असताना वडाळा बहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांचे दुखःद निधन

जामखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप पाटील (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले. पाटील यांची तालुक्यात ओळख आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होती, जवळा जिल्हापरिषद गटात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात. पक्षाच्या विवध पदांवर काम करत असतानाच पाटील यांनी जवळा सेवा संस्थेच्या चेअरमनपदी, ‘जामखेड तालुका … Read more

दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून महिलांनी केली ‘त्या’ महिलेस बेदम मारहाण

पारनेर :- अवैध दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून तीन महिलांनी एका महिलेस बेदम मारहाण केली. मारहाणीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना देवीभोयरे येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून तीन महिलांसह मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. देवीभोयरे येथील कौलवस्तीवर एक महिला अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पीडित … Read more

लॉकडाऊनमधून आणखी सूट

मुंबई, दि. २३ : राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने आज काढला आहे. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये … Read more

धक्कादायक : राज्यात एकाच दिवशी वाढले ७७८ कोरोना रुग्ण, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार … Read more

मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे. गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत. प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. … Read more

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

नेवासा :- तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती, सासरा, सासूसह पाच जणांवर गुन्हा नोंदवला. मिराचा मृतदेह विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळला होता. तिचे माहेर व सासर गावातीलच आहे. मीराचे वडील हरी भिका गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत विहीर खणण्यासाठी माहेरून दीड लाख रूपये आणावेत, यासाठी मीराचा छळ करण्यात आल्याचे नमूद केल्याने पाेलिसांनी … Read more

बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 :- बीएसएनएलने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉल नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी येत्या ५ मेपर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान ज्या युजर्सच्या अकाऊंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे … Read more

सरपंच स्वत: भरणार ग्रामस्थांची पाणीपट्टी !

अहमदनगर Live24 :- सध्या जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जग अडचणीत आले असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्दचे (ता.शेवगाव) लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी एप्रिल व मे या दोन महिन्याची गावातील ग्रामस्थांची पाणीपट्टी स्वत: भरण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघात ८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

अहमदनगर Live24  :- कर्जत तालुक्यात आठ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकर सुरू करणे आवश्यक असल्याने सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीमध्ये याबाबत आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना काही गावात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंचायत समितीमधून … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द येथे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी प्रकाश तुळशीराम गिते (वय ४६) यांच्यावर बिबट्याने sangहल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी प्रकाश गिते हे प्रवरा उजव्या … Read more

प्रवरेतून पाण्याची उधळपट्टी का?

अहमदनगर Live24 :- प्रवरा नदीचे तब्बल चाळीस दिवस चाललेल व पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणीवापर झालेले असताना लगेच तिसऱ्या दिवशी आवर्तन कशासाठी व पाण्याची उथळपट्टी का असा सवाल भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री व जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी धरण लाभक्षेत्रात भरपूर पाऊस झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला,जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ३८ !

अहमदनगर :- जामखेड येथे काल कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५ ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. काही दिवसापूर्वी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील श्रावणबाळ ! ८० वर्षांच्या आईला घेऊन निघाला गावाला

संगमनेर :- सध्या जगभरात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. देशात व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता लहान-मोठे उद्योगधंदे तसेच वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ निर्माण झाली आहे. अशातच एक मुलगा आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला तीनचाकी … Read more

श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण !

श्रीगोंदा :- तालुक्यातील यापूर्वी पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीगोंदेकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आता नवीन निघालेला आजार म्हणजे सारी चा एक संशयित रुग्ण श्रीगोंद्यात आढळल्याने पुन्हा श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात कोरोना विषाणूशी संबंधित लोकांचे सर्वच्या सर्व अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. मात्र आता आता … Read more

माजी आमदार औटींच्या दुर्लक्षामुळे पाण्याचे संकट !

पारनेर :- ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीची १५ वर्षे सत्ता असतानाही मुलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने तलावात पाणी असूनही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड दयावे लागत असल्याची घणाघाती टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक चंद्रकांत चेडे यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे नाव न घेता केली. गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरास विलंबाने पाणीपुरवठा होत असून त्या … Read more

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतर पाळा

मुंबई दि.23 :- कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर राखून पाण्याचे वितरण करण्यासाठी तातडीने  स्थानिक स्तरावर संबंधित गाव/ वाड्यांमध्ये आवश्यक उपाययोजना करावी असे  निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. पिण्याच्या … Read more

संगमनेर शहरातील ‘हा’ भाग ७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवांसह सर्व बंद

संगमनेर :- शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, उम्‍मद नगर, एकतानगर, शिंदेनगर नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २३ एप्रिल रोजी संगमनेर शहरातील या भागात ०४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात … Read more