रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा ‘मदतीचा हात’ ! १५ हजार कुटुंबांसाठी ४ ट्रक कांदा-बटाटे

अहमदनगर – कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमीहीन, मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलो कांदा व एक किलो बटाटा देण्यात येणार आहे. … Read more

सार्वजनिक ठिकाणी ‘ही’ चूक केल्याने जेलची हवा

श्रीगोंदा – शहरातील जुबेर मोहम्मद इसाक कुरेशी रा.कुरेशी गल्ली येथील तरुणाने रोकडोबा चौकात येऊन सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन पिचकारी मारत असतांना दिसल्याने या व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडुन कोरोना विषाणूचा धोका असल्याचे माहिती असून देखील संसर्ग पसरण्याचा कारणीभूत होईल असे वर्तन केल्याने … Read more

कामावर जात नसल्याने पत्नीने केली पतीला मारहाण !

चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळत असले तरी लॉकडाऊनचे अनेक साइड इफेक्टही आता पुढे येत आहेत. अशीच एक घटना पुढे आली असून, लॉकडाऊनमुळे कामासाठी न जाता घरीच बसून राहणाऱ्या पतीला पत्नीने मारहाण केली आहे. याबाब पतीने मारहाण करणाऱ्या पत्नीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे. शनिवारी हा प्रकार उजेडात आला. लॉकडाऊनमुळे … Read more

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले काळजी करू नका…

श्रीगोंदे :- काही ठिकाणी गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, काळजी करू नका. सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. घोडचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, उपअभियंता दिलीप साठे, देशमुख यांच्यासमवेत पाचपुते यांनी रविवारी चारी ९ ते १४ ची पाहणी केली. ते म्हणाले, १३२ … Read more

गावाकडे पायी चाललेल्या महिलेची बँकेत झाली प्रसूती…

सोनई :- कोरेगाव भीमा येथे पोटापाण्यासाठी मोलमजुरी करणारे कुटुंब काम नसल्याने व खाण्याची भ्रांत निर्माण झाल्याने गर्भवती पत्नीसह यवतमाळ येथे पायी जात होते. त्यातील संदीप काळे यांच्या पत्नी निर्मला संदीप काळे (३२) या गर्भवती महिलेस वडाळा बहिरोबा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या वडाळा येथील शाखेत आडोशाला … Read more

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 :- नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ (वय ३०) या विवाहितेने रविवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी माहेरच्या लोकांनी छळ व मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : निधनानंतर चार दिवसांनी ‘त्या’ व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट …

अहमदनगर – निधनानंतर चार दिवसांनी जामखेड तालुक्यातील व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.हा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यावर घरातील चार व्यक्ती व संबंधित व्यक्तीला तपासणाऱ्या खासगी हाॅस्पिटलच्या डॉक्टरांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले. दरम्यान, परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या चारही जणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रविवारी दुपारी नगर येथून सोडण्यात आले आहे. त्यांना आता जामखेड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. आज आणखी ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल काल पॉझिटिव्ह … Read more

अखेर ‘त्या’ अहमदनगरकरांनी कोरोनाला हरवलं !

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत. आज संगमनेर तालुक्यातील ०४ तर जामखेड येथील ०४ रूग्ण त्यांचा १४ दिवसानंतरचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त … Read more

अहमदनगर गुड न्युज : जिल्ह्यातील आठ रुग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 :- अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी आहे, अहमदनगर मध्ये  उपचार घेणारे आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता लवकरच त्यांची सुट्टी होणार आहे.  जामखेड येथील ०४ कोरोना बाधीत व संगमनेर शहरातील 3 आणि व आश्र्वी बुद्रुक येथील एक अश्या एकूण ८  रुग्णांचा १४ दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून  या आठ व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या … Read more

#Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी

अहमदनगर :- जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले. उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील … Read more

सावधान : बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा होतेय कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 :- चीनमध्ये कोरोना आजारापूसन निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दक्षिण कोरियाने यामागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्राथमिक चाचण्यांच्या अहवालातून विषाणूंचे काही अवशेष शरीरात राहत असल्यामुळे रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. यापैकी अनेक … Read more

धक्कादायक : नर्ससह मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला

औरंगाबाद :- शहरातील कुंदवाडी परिसरातील तोरणागड म्हाडा कॉलनीत एका १३ वर्षीय मुलीसह नर्सचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला.ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.१८) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान कौटुंबिक कलहातून मुलीला झोपेच्या गोळ्या आणि इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्यानंतर स्वत: त्याच गोळ्या, इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.  आशा … Read more

डॉक्टर्स फोनद्वारे देणार मोफत वैद्यकीय सल्ला

राहाता :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये किरकोळ व साध्या आजारांसाठी रुग्णांना प्राथमिक पातळीवरील औषधोपचार व वैद्यकीय सल्ला त्वरित मिळावा तसेच रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राहाता तालुक्यातील श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या सहा डॉक्टरांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. फोनद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांच्या वतीने डॉ.स्वाधिन गाडेकर यांनी … Read more

Live Updates :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ?

अहमदनगर Live24 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे, उद्यापासून काही नियमांमध्ये शिथीलता आणण्यात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधून माहिती दिली शासनातर्फे काही नंबर जाहीर करण्यात आले आहेत. महिलांसाठी १०० नंबरवर सहकार्य उपलब्ध असणार आहे. १८०० १२० ८२००५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. १८०० १०२ … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन महत्त्वाचे – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर :-  लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत.या सर्व नागरिकांना राज्य शासनाने बसची व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहोच केले पाहिजे, असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत … Read more

राहत्या घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

अहमदनगर :-  नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. अजीनाथ बाळासाहेब काळे (वय २९) असे सदर आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.राहत्या घरातील छताच्या लाकडी ओंडक्याला साडी बांधून त्याने गळफास घेतला. आत्महत्या केलेल्या युवकाच्या वडीलांनी घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सुधाकर काळे यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉटस्पॉटमधील लॉकडाऊन वाढविला

अहमदनगर :-  नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून १३ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटस्पॉट मधील लॉकडाऊन १९ एप्रिल ते २७ एप्रिलपयंर्त वाढविल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. या दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा ही २७ एप्रिलपयंर्त पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. नेवासा शहरात १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर प्रशासनाने शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय … Read more