अहमदनगर जिल्ह्यातील ५६ व्यक्तींचे रिपोर्ट्स आले निगेटीव्ह

अहमदनगर Live24 :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, नेवासा येथील २४, श्रीरामपूर येथील ११, नगर शहर ०६, राहता ०३, पाथर्डी तालुक्यातील ०२, राहुरी ०२, कोपरगाव येथील ०४ तर अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत, कोरोना बाधीत … Read more

दहा रुपयांची तंबाखू पुडी झाली पंचवीस रुपयांना !

अहमदनगर Live24 :- कर्करोगाचा धोका असला, तरी तंबाखूला मोठी मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे टपऱ्या बंद आहेत. तंबाखूचे दर ठोक बाजारात वाढवण्यात आल्याचे कारण पुढे करत सध्या चढ्या दराने पुडीची किरकोळ विक्री सुरू आहे. तंबाखू सर्व पानटपऱ्या, तसेच किरकोळ किराणा दुकानात सहज मिळते. मात्र, कोरोना लाॅकडाऊनमुळे केवळ जीवनावश्यक साहित्य, तसेच आरोग्य सेवा मिळवण्याचीच मुभा आहे. मागील पंधरा … Read more

प्रा. राम शिंदे झाले मतदारसंघात सक्रीय !

कर्जत – विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत. मात्र, करोनामुळे अडचणीत असलेल्या काळात त्यांनी सक्रिय होत जनतेला आधार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेतून बरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले अशी लोकभावना उमटत … Read more

अहमदनगरकरांसाठी आनंदाची बातमी : आता सर्वांनाच मिळणार पेट्रोल !

अहमदनगर Live24 :-  अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल देण्याबाबतच्या आदेशात जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी अखेर दुरूस्ती केली असून आता उद्यापासून दररोज पहाटे ५ ते ९ या कालावधी सर्वाना पेट्रोल दिले जाणार आहे. यापूर्वीच्या आदेशात जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ दुरूस्ती केली असून अत्यावश्यक सेवेतील पोलिस, वैद्यकीय, पत्रकार, बँकींग- पतसंस्था कर्मचार्‍यांसह शेतकरी- दूध उत्पादक यांच्या खासगी वाहनांना पेट्रोल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका युवकाने  सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील  पेडगावमध्ये राहणार्‍या एका युवकाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून बौद्ध धर्माचे समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केले. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील … Read more

लॉकडाऊन नियमावली जाहीर : ‘या’ सर्व सेवा रहाणार बंद,मास्क घालणं अनिवार्य तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 :- देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. MHA issues updated consolidated revised guidelines after correcting the date from 20th May to 20th April 2020, on the … Read more

एकाच दिवशी दोन मृत्यू, तालुक्यात उडाली खळबळ

कोपरगाव : शहरातील कोरोना बाधित आढललेल्या ६० वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. १४) पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेला श्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ही महिला मयत झाली. या महिलेच्या मृत्युमुळे जिल्हयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तलवारीचा धाक दाखवून बलात्काराची धमकी देत श्रीगोंद्यात दरोडा

अहमदनगर Live24 :-  श्रीगोंदा शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. महिलेवर तलवारीने वार करीत जखमी केले आहे. सोन्याचे दागिने घेवून पसार होणारे आरोपी अत्याचार करण्याच्या तयारीने आले होते मात्र अनर्थ टळल्याची महिती पोलिसांकडून समजली. दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पळून गेलेल्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 :- सिव्हिलमध्ये कोरंटाईन होण्याऐवजी डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक पसार झाला होता. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी डॉ. श्रीकांत चंद्रकांत पाठक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते अधिकारी पुणे येथे जाऊन आल्याने … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय

अहमदनगर : आजारी असलेल्या आईच्या औषधासाठी मुलाने थेट साद घातली ती जिल्हाधिकाऱ्यांना! त्यानंतर त्या सादेला प्रतिसाद देत पाउण तासात आवश्यक असलेली औषधे मुकुंदनगर येथील त्या मुलाच्या घरी पोहोच झाली. या घटनेतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय आला नसेल तर नवल ! कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी आहेत. मुकुंदनगरमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने … Read more

कोरोनामुळे देशात भूकबळी जाण्याचा धोका वाढला

इस्लामाबाद : प्राणघातक कोरोनाने पाकिस्तानला घट्ट विळखा घातला आहे. त्यामुळे संकट आणखी वाढले असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी मदतीसाठी जगापुढे हात पसरले आहेत. आतापर्यंत घेतलेले कर्ज माफ करण्याचे साकडे त्यांनी घातले आहे. लॉकडाऊनमुळे लाखो नागरिकांचा भूकबळी बळी जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यावरून पाकने कोरोनापुढे सपशेल गुडघे टेकल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकमध्ये कोरोनाचे … Read more

महाराष्ट्रावर कोसळणार हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम :-अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यातील बळीराजासमोर सातत्याने अडचणी वाढत आहेत. महापुरात पिके वाहून गेल्यानंतर प्रयत्नाची पराकाष्टा करत घेतलेली उन्हाळी पिके सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतातच कुजत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यापूर्वीच बळीराजाला खरीब हंगामात बियाणे टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या देशी बियाणांवरच अवलंबून राहावे लागणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्‍हयातील सर्व दारु दुकाने ‘या’ तारखेपर्यत बंद !

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर देशात व महाराष्‍ट्र शासनाने लागू केलेल्‍या लॉक डाऊनचा कालावधी विचारात घेता आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व महाराष्‍ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्‍वये जिल्‍हयातील सर्व देशी/ विदेशी मद्य विक्री दुकाने 30 एप्रिल 2020 पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहे. जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी … Read more

देवीच्या यात्रेची पालखी पोलिसांनीच आणली..

सोनई : घोडेगाव येथील जागृत देवस्थान घोडेश्वरी देवी यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. परंतु घोडेश्वरी देवी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व विधी,पूजाअर्चा तसेच आत्ताची चैत्र यात्रा देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच भाविकांशिवाय पार पडली. पोलीस बांधवांनी देवीच्या पालखीला खांदा दिला. चैत्र पंचमी तिथीला व १२ एप्रिल या तारखेला घोडेश्वरी यात्रा उत्सव सोहळा … Read more

प्रवरा नदीत बुडणाऱ्याला तरुणाने वाचविले

अकोले: अकोले तालुक्यातील ढोकरी येथे प्रवरा नदीच्या पाण्यात यशवंत डोळस हे पोहत होते. पोहत असताना ते दोन धाऱ्यापर्यंत पोहचले अन् गटांगळ्या खाऊ लागले. समोरच नदीच्या काठावर उभ्या असलेल्या अर्जुन पथवे या आदिवासी तरुणाच्या हे लक्षात आले. त्याने आपला जीव धोक्यात घालून थेट नदीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या यशवंतचे प्राण वाचविले. शनिवार,दि.११ रोजी दुपारची ही घटना … Read more

संगमनेरच्या मालपाणी परिवाराची कोरोना लढ्यासाठी सव्वा कोटींची मदत !

संगमनेर : राष्ट्रीय आपत्ती असो वा धार्मिक, सामाजिक कार्य असो प्रत्येकवेळी आपल्या दातृत्त्वाचा परिचय देणाऱ्या संगमनेरच्या मालपाणी परिवाराने ‘कोरोना’शी लढणाऱ्या शासन व प्रशासनाला भरीव अर्थसहाय्य केले आहे. स्थानिक पातळीवर कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी ‘संगमनेर सहाय्यता निधीला’ पाच लाखांचा धनादेश दिला. आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मालपाणी परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास … Read more

अहमदनगर करांसाठी अत्यंत महत्वाची बातमी वाचा आणि शेअर करा …

अहमदनगर :- कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, अहमदनगर छावणी परिषद तसेच जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास दि.15 एप्रिल 2020 ते दि.30 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी … Read more

‘त्या’ रुग्णाला तपासणाऱ्या तीन डॉक्टरांसह ११ जण क्वारंटाईन

नेवासा : शहारातील एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. नेवासा शहरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासा शहरात अत्यावश्यक सेवाही दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. सोमवारी सकाळी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महिती मिळताच शहरातील चालू असलेल्या … Read more