नेवासाफाटा येथे श्रीराम आश्रम मुकिंदपुर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : काल  राज्यभरात शिवराञी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकाची लगबग सुरू आहे. श्रीराम आश्रम मुकिंदपुर मंदिर येथे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. महंत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते महाशिवरात्रीनिमित्त पाटे वेद मंत्रा च्या जयघोषात जलाभिषेक दुग्धाभिषेक करून वातावरण भक्तिमय झाले होते … Read more

आणि ते चौघे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- तालुक्यातील कडित बुद्रुक येथील शेतकरी तुळशीराम वडितके हे पत्नी व मुलासह ऊस तोडणी सुरु असलेल्या आपल्या शेतात काल पहाटे 5.30 वाजता मोटरसायकलवरुन जात असताना कोल्हार-बेलापूर रस्त्यावर कडित खुर्द व कडित बुद्रुक शिवरस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग सुरु केला. मात्र गाडी वेगात असल्याने वडितके कुटुंबिय … Read more

संविधानाच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांची गरज : सुधीर तांबे

अहमदनगर :- केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याची कोणतीही आवश्यकता नसताना देशभर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यामुळे धार्मिक द्वेष वाढीस लागून देशाचे सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ शकते, असे मत आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.  इसळक ( ता. नगर) येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना … Read more

विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  : विखे-पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील,  जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. विशेष म्हणजे  या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांनी या विधानवर फक्त स्मितहास्य केले. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाणार … Read more

ठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये संघर्ष पेटला, सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : जनतेमधून सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा, ही राज्य सरकारची शिफारस राज्यपालांनी फेटाळली आहे. त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात हे विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ग्रामपंचायत निवडणुकीत थेट … Read more

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी ‘त्या’ पोलिसांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेतील १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच गिरवले यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे. केडगाव दुहेरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: वाळू तस्करांकडून महिला तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी निघालेल्या शिरूरच्या महिला तहसीलदार एल.डी.शेख यांच्यावर पाळत ठेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.  या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी एकाला शिरूर पोलिसांनी तर दुसर्‍याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. अशोक सहादू वाखारे (रा.वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर),स्वप्नील साहेबराव जाधव ( रामलिंग, शिरूर … Read more

महाशिवरात्रीला पहिल्यांदाच उपवासाचे शिवभोजन

अहमदनगर : आज महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. एकादशी,चतुर्थी किंवा इतर दिवशी शिवभोजन थाळी योजने मध्ये उपवासासाठी काही थाळ्या राखीव ठेवणे शक्य नसले तरी महाशिवरात्री ला मात्र शिवभोजन थाळीत उपवासाचे पदार्थ मिळणार आहेत. केंद्र चालकांमध्ये उपवासाच्या मेन्यू बद्दल सुरुवातीला संभ्रम होता. मात्र आता शासनस्तरावरून च सूचना आल्याने हा संभ्रम दूर … Read more

कॅन्सर असणाऱ्यांसाठी खुशखबर, सुरभि हॉस्पिटल मध्ये मिळणार मार्गदर्शन

अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे  कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात  सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले  आहे. या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रिकेत नाव न टाकल्याने तलवारीने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगर तालुक्यातील माळवाडी शिरढोण गावात असलेल्या श्री महादेव मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या आमचे नावे असलेल्या पत्रिका का वाटल्या नाही तसेच नवीन छापलेल्या सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमची नावे का टाकली नाही. असे म्हणत रामदास छबुराव वाघ , वय ६५ , जगदिश रामदास वाघ , सुनील … Read more

इंदोरीकर महाराज म्हणतात मी ते वाक्य बोललोच नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं. या वाक्यामुळे  पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांना  नोटीस देण्यात आली होती. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या … Read more

दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  येथील टिळक रोडवरील संकेत गार्डनजवळ एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. ओंकार महेश बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संतोष चव्हाण, राहुल सोळंके, नितीन बल्लाळ व अन्य एका जणाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. फिर्यादीस काहीही कारण नसताना … Read more

घर फोडून २० हजारांचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर तालुक्यातील देहरे गावात घरफोडीची घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. घरातील 20 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 1500 रुपये असा एकूण 20 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. निशा रामराव हापसे यांनी फिर्याद दाखल केली. हापसे यांच्या दरवाजाचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला व सदरील ऐवज … Read more

आई आणि मुलास मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी – शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे. यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या आवारामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला टेम्पो मालक-चालक संघटनेच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली … Read more

तहसीलसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : तालुक्यातील जांभळे गावात जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद सुरू आहे. या वादातून तबाजी खरात या व्यक्तीने अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली. अकोले पोलीस ठाणे व संबंधित विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी … Read more

कुऱ्हाडीने मारहाण करून जीव मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बालवड येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. गोरख रंगनाथ माने (वय 65) यांनी फिर्याद दिली. मच्छिंद्र रंगनाथ माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एका भावाने दुसऱ्या भावास मारहाण केली. माझ्या शेतातील कडब्याचा ट्रक का अडविला, तुला जास्त झाले आहे काय असे म्हणत … Read more

महाराष्ट्र सदनात सैनिकांचा घोर अपमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात देशाच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या सैनिकांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याचा निषेधार्ह प्रकार नवीन महाराष्ट्र सदनात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या गोरखा रेजिमेंटच्या जवानांना व्हीआयपी नसल्याचे सांगून सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जेवणाच्या भर ताटावरून उठवल्याचे समोर आले आहे. छत्रपती … Read more