इंदुरीकर महाराज चुकीचे वाटत असतील तर त्यांची आधी पूर्ण पार्श्वभूमी पाहावी – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदुरीकर महाराज यांचा स्वभाव, राहणीमान, त्यांचे विचार-आचार चांगले आहेत. ते शाळा चालवतात. महाराजांचे जनजागृतीचे काम आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, मुले असे सर्वच भाविक त्यांचे विचार ऐकत असून त्यांचे विचार लोकांना पसंत आहेत,’ असे मत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले. इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगीच्या जन्माबद्दल केलेल्या वक्तव्या बाबत लोखंडे … Read more

‘त्या’आजी माजी नगरसेवकांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटार प्रकरणात सुमारे १३ कोटी कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांच्या अपहारप्रकरणी केतन खोरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी चौकशीसाठी २० फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत २९ आजी माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहेत. भुयारी गटारप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा यांच्यासह दोन … Read more

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार अवकाळीची भरपाई : मंत्री गडाख

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सोनई गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे बाधीत झालेल्या शेतपिकाचे पंचनामे होऊन देखील नेवासे तालुक्यातील दहा हजारांवर शेतकऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या हप्त्यातील वाटपात शासकीय नुकसान भरपाई मिळाली नव्हती. वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आली असून त्याची रक्कमही जिल्हा अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती मृद व … Read more

इंदोरीकर महाराज संकटात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडिटी सल्लागार समिती कडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. … Read more

साईकृपाला लागलेल्या आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचा असलेला साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि.  या साखर कारखान्यात काही भागाला सोमवारी सायंकाळी आग लागली. आगीमध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचे आसपास नुकसान झाल्याची शक्यता असून उशिरापर्यंत फायर ब्रिगेडची वाहने आग विझवत होते. मात्र, नक्की नुकसान किती झाले, याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साईकृपा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील मा.मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या साईकृपा शुगर अॕन्ड अलाईड इन्डस्ट्रिज लि.या साखर कारखान्याला आज दि.१७ रोजी सायंकाळी भिषण आग लागली आहे. या आगीमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तात्काळ कारखान्यात अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. … Read more

अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. वृषाली मेंगवडेचे वकृत्व स्पर्धेत यश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वकृत्व परिषद, महाराष्ट्र राज्य व गणेशभाऊ आनंद युवा मंच आयोजित सहकार महर्षी कै.शिवाजीराव नागवडे (बापु) यांच्या स्मरनार्थ ‘ महाराष्ट्रचा महावक्ता’ ही राज्यस्थरीय वकृत्व स्पर्धा नुकतीच अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.   स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु.वृषाली सुरेंद्र मेंगवडे (एम.एस.सी.) हिने यशस्वी रित्या सहभाग होऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. या यशाबद्दल कु.वृषाली मेंगवडे हिचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते … Read more

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या … Read more

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली … Read more

अकोल्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोले : आदिवासी अकोले तालुक्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा, अशी मागणी संगमनेर जिल्हा व अकोले आदिवासी विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सतिष भांगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, निव्वळ आदिवासी भागात छोट्या मोठ्या धरणात २०.७६ टिएमसी पाणी साठले जाते. त्याबळावर अकोले तालुक्यातील ९१ … Read more

हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद- ना. थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले तालुक्यातील कोंभाळणेसारख्या छोट्याशा गावातून जिद्द व मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र केसरी मिळविलेला हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला. यावेळी माजी आ. राहुल जगताप, माजी … Read more

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा अखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजप अध्यात्मिक आघाडी व धार्मिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संगमनेर, अकोले, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास … Read more

भाजप युवा मोर्चच्या शहराध्यक्षाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

अहमदनगर : शहर भाजप युवा मोर्चाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष श्री. अज्जुभाई शेख यांनी मा. नामदार श्री बाळासाहेब थोरात यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. भाजपा सरकार CAA, NRC कायद्या आणून अल्पसंख्याक समाजाविषयी तेढ निर्माण करीत आहे. केंद्रातील भाजपाच्या या भुमिकेला विरोध म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेस … Read more

शहरात बिबट्याचा मुक्‍त संचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार … Read more

नामदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्रात आणि स्वताचेच गाव गेले विरोधात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- भाजप सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातूनच विरोध करण्यात आला आहे. जोर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला … Read more

कुत्र्याच्या तोंडात आढळले मृत अर्भक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- निमगाव जाळी येथील उसाच्या शेतातून कुत्रे तोंडात मृत अर्भक घेऊन जात असल्याचे आढळले. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. हे अर्भक पुरुष जातीचे आहे. लोकांनी आरडाओरडा केल्यावर कुत्रे अर्भक सोडून पळून गेले. पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना या घटनेची माहिती दिली. This Story … Read more

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्ता निवृत्ती शेलार या युवकावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेलार याने या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मोठ्याने आरडाओरड केला. तिच्या आईने तो एकून तिकडे धाव घेतली. … Read more

तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. याचे पडसाद चौथ्या दिवशीही सुरू होते. भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदोरीकर महाराजांवरील वादात उडी घेतली. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदोरीकरांना समर्थन दर्शवलं आहे. तर इंदोरीकर महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल आखिल भारतीय वारकरी मंडळ, … Read more