कोरोनाच्या संशयितांना सक्तीने ताब्यात घेऊन इतरांपासून विभक्त ठेवणार !

लंडन : चीनमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उद्रेक आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आणि घातक धोका असल्याची घोषणा सोमवारी ब्रिटनने केली. यासोबतच आजपासून कोरोनाच्या संशयित रुग्णांना सक्तीने ताब्यात घेऊन इतरांपासून विभक्त ठेवले जाईल, असेही ब्रिटनच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात चीनमधून आलेल्या … Read more

धक्कादायक : अवघ्या एका महिन्यात अहमदनगरमधून 37 अल्पवयीन मुलींला पळविले !

जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींला पळविले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारीमध्ये आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेल्या सिलिंडरचा स्फोट

नगर तालुक्यातील भोरवाडी येथील पद्मावती वस्तीवर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आज रात्री साडेसात वाजता घडली.  विमल बबन जाधव यांच्या घरात ही घटना झाली. विशेष म्हणजे, हा सिलिंडर पंतप्रधान उज्वला योजनेतून मिळालेला आहे. विमल जाधव या स्वयंपाकाच्या तयारी करत होत्या. त्यामुळे त्यांनी गॅस शेगडी पेटवली. परंतु सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ गॅस गळती सुरू झाली. त्याच … Read more

बाजार समितीच्या आवारातून दोन टन कांदा चोरला

नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून खरेदी केलेला दोन टन 934 किलो कांदा चोरून नेल्याची घटना 4 जानेवारी रात्री घडली.  याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापारी बाळासाहेब बायाजी आंधळे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.आंधळे नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा व्यापारी आहेत. … Read more

तरुणाची कालव्यात उडी घेत आत्महत्या

श्रीरामपूर :- येथील कृष्णा बाबासाहेब साबळे (वय ४१) यांनी शहरातील कालव्यात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अशोकनगर परिसतील कालव्यात नागरिकांना साबळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते, पत्नी, भाऊ, तीन बहिणी, चुलत भाऊ असा परिवार आहे. साबळे शुक्रवारपासून बेपत्ता होते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कॉलेजमध्ये होतेय रॅगिंग ?व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पारनेर अळकुटी रोडवर असणार्‍या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका विद्यार्थ्याबरोबर इतर सहा ते सात विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रॅगिंगचा प्रकार की अन्य काही याचा तपास या औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या समितीने सुरू केला असून या संबंधीची लेखी तक्रार संस्थेतील एका विद्यार्थ्यासह पालकांनी केली आहे. तर दुसरीकडे या … Read more

शिर्डी बाह्यवळण रस्त्याची दुर्दशा,सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म !

शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर पिंप्री निर्मळ येथे सोमवारी ग्रामस्थांनी सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. शिर्डी ते निर्मळप्रिंपी बायपासची दुरवस्था झाली असून खड्डे आणि उडणारा फुफाटा यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवला. ट्रकचालकांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आम्हाला अटक करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार कुंदन हिरे … Read more

२४ वर्षांच्या मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने आई, वडिलांसह भावाची आत्महत्या

नागपूर मध्ये  २४ वर्षांच्या मुलीने पळून जाऊन इतर जातीच्या मुलाशी विवाह केल्याने दुःखी झालेल्या आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली येथे सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी आढळली नसली तरी या परिसरात मुलगी पळून गेल्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (५०), वैशाली रवींद्र वरगंटीवार (४३) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (१९) … Read more

शेतातील उभ्या पिकासह झाडे व पाइपलाइन पेटवली

राहुरी :- तालुक्यातील मंडलिकवस्ती येथील शेतातील उभ्या पिकासह झाडे व ठिबक सिंचनची २१०० फुटांची पाइपलाइन अज्ञात व्यक्तींनी पेटवली. त्यामुळे नुकसान झाले. या प्रकरणी खंडू पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. शिंदे यांची वांबोरी-डोंगरगण मार्गावर डोंगराच्या पायथ्याशी शेतजमीन आहे. या जमिनीत मठाचे पीक काढणीसाठी आले होते. तेथे … Read more

अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

भंडारा | दुचाकीने जाणाऱ्या अंगणवाडी सेविकेला दोघांनी रस्त्यात अडवले. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला. ही संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या रेखाटोला ते फुळबोडी गावादरम्यानच्या जंगलात घडली. पीडित अंगणवाडी सेविका ही तिला नेमून दिलेल्या गावातील अंगणवाडीला दुचाकीने जात होती. सोमवारी सकाळी ती दुचाकीने जात असताना सदर जंगलाचा फायदा घेत दोघांनी … Read more

लग्नानंतर प्रेमास नकार देणार्या विवाहितेची प्रियकराने केली हत्या

परभणी | ऊसतोड टोळीतील विवाहित महिलेचा तिच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराने कत्तीचे वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी २४ तासांतच आरोपी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळेला पुण्यातून अटक केली. रामपुरी शिवारातील उसाच्या शेतात शनिवारी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तिचे विवाहापूर्वी संजय जोंधळे याच्याशी प्रेमसंबंध होते, ही बाब उघडकीस आली. अटकेनंतर आरोपींनी खुनाची … Read more

भाजपच्या तालुकाध्यक्षपदावरून पारनेर भाजपमध्ये अंतर्गत वाद

जिल्ह्यातील काही नेत्यांनी पारनेरचे तालुकाध्यक्षपद वसंत चेडे यांना देऊन सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय केला. शिष्टमंडळ लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कुणीही चालेल, चेडे नको अशी भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी दिली. कोरडे यांच्या निवासस्थानी रविवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युवक युवतींना पोलीसी पाहुणचार

श्रीगोंदा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या, कायदा मोडणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुपारी अचानक शहरातील काही कॅफे सेंटरवर जाऊन त्यांची तपासणी केली.  शहरात कॅफे सेंटरमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी अश्लील चाळे करतात, काही गैरप्रकार या कॉफी सेंटरमध्ये होत असल्याच्या अनेक तक्रारी पो नि … Read more

Delhi Results Live आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  ७० जागांकरता झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होत  आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे. Delhi Results Live   आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर आप ५४ जागेवार घाडीवर … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू

अहमदनगर :- चीनहून परतलेल्या आणखी २३ जणांची सोमवार (१० फेब्रुवारी) ला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या दक्षतेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शेनानुसार ही तपासणी करण्यात आली आहे.  दरम्यान, चीनहून गेल्या आठवड्यात देखील २७ जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक जणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्या घशातील लाळेचे … Read more

हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये – मकरंद अनासपुरे

मुंबई : हिंगणघाट येथील पीडित तरूणीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, अशी प्रतिक्रिया अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर अनासपुरे यांनी संताप व्यक्त केला … Read more

‘त्या’ भगिनीचा मृत्यू राज्यासाठी लाजीरवाणा – उपमुख्यमंत्री

मुंबई : हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी ही … Read more

100 वर्षे वयाच्या आजीला पुन्हा मिळाली दृष्टी

अहमदनगर:- जागतिक दर्जाच्या नेत्रोपचारांनी सुसज्ज असलेल्या जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालयात राज्यभरातील नेत्ररूग्णांवर परिणामकारक उपचार करण्यात येतात.नेत्रालयातील या सेवेमुळे नुकतीच १०० वर्षांच्या वयोवृध्द आजीला नवी दृष्टी मिळाली आहे. अधू झालेल्या डाव्या डोळ्याने प्रथमच लख्खपणे सर्वांना पाहताना आजीच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी घरातील आपल्या नातलगांनाही त्या पाहू शकत नव्हत्या.आनंदऋषीजी नेत्रालयाच्या रुपाने … Read more