हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये – मकरंद अनासपुरे

मुंबई : हिंगणघाट येथील पीडित तरूणीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, अशी प्रतिक्रिया अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर अनासपुरे यांनी संताप व्यक्त केला … Read more

‘त्या’ भगिनीचा मृत्यू राज्यासाठी लाजीरवाणा – उपमुख्यमंत्री

मुंबई : हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी ही … Read more

100 वर्षे वयाच्या आजीला पुन्हा मिळाली दृष्टी

अहमदनगर:- जागतिक दर्जाच्या नेत्रोपचारांनी सुसज्ज असलेल्या जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी नेत्रालयात राज्यभरातील नेत्ररूग्णांवर परिणामकारक उपचार करण्यात येतात.नेत्रालयातील या सेवेमुळे नुकतीच १०० वर्षांच्या वयोवृध्द आजीला नवी दृष्टी मिळाली आहे. अधू झालेल्या डाव्या डोळ्याने प्रथमच लख्खपणे सर्वांना पाहताना आजीच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी घरातील आपल्या नातलगांनाही त्या पाहू शकत नव्हत्या.आनंदऋषीजी नेत्रालयाच्या रुपाने … Read more

कोरोना विषाणू : 9400 पेक्षा अधिक लोक निगराणीखाली 

कोरोना विषाणूबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन माहिती दिली आहे. सध्या 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9452 व्यक्ती सामुदायिक निगराणीखाली आहेत. नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्वच राज्ये कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपली जलद पथके वारंवार बळकट करत आहेत. एकूण 1 हजार 510 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली … Read more

या राशीच्या लोकांना Valentine Day जाणार सुंदर ! मिळू शकतो हवा तो ‘पार्टनर’

Valentine’s Day हा प्रेमाचा दिवस आहे आणि याची सुरवात रोज डे  पासून होते.प्रेमात असलेला प्रत्येक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी ज्यांना प्रेमाची आवड आहे ते आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस केवळ प्रेमळ जोडप्यांसाठी खास नाही तर अविवाहित लोक देखील या दिवसाची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते आपल्या प्रियजनांबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त … Read more

वऱ्हाडाच्या बसला अपघात; १८ प्रवाशी जखमी

पालघर :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरजवळ लग्नाची वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे.सकाळी पहाटे सुमारास ही घटना घडली. या घटनेत कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी १८ जण जखमी आहेत.  यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या वऱ्हाडीची बस वसईहून वलसाडला निघाली होती. यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळील … Read more

ब्रेकिंग न्यूज : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या विष्णू भागवतला अखेर अटक !

नाशिक / अहमदनगर :- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि.च्या मुख्य संचालक तथा सूत्रधार विष्णू भागवत यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे.  न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमीष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रूपयांची हजारो … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी इंटरनेट आणि वायफाय बंदी !

अहमदनगर ;- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नगरमधील परीक्षा केंद्रांवर इंटरनेट आणि वायफाय बंदी करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे निर्देश दिले आहेत.  आज जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दक्षता समितीसोबत बैठक घेतली . यावेळी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा आणि परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला . यावेळी परीक्षा सुरू असताना … Read more

खंडाळा गावाचे उपसरपंचाचे पद रद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींचा निर्णय

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावचे उपसरपंच भास्कर कारभारी ढोकचौळे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केले आहे. उपसरपंच ढोकचौळे यांनी मुलाच्या नावावर गावातील पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम केले होते. खंडाळा गावातील शाहू-फुले चौकात सुमारे 2 लाख 80 हजार रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते. उपसरपंच भास्कर ढोकचौळे यांचा मुलगा अमोल याने हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ पीएसआय’ च्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणाऱ्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार काल रात्री घडला . पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्जत येथील जेलमधून ४ आरोपी काल फरार झाल्यानंतर जिल्हाभर पोलीसांनी नाकेबंदी केली. श्रीरामपुरातही नेवासा रोडवर बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर … Read more

शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत : ना. प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : राज्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांवर उद्याची गुणवंत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याने शिक्षकांनाकडे अशैक्षणिक कामे नकोच, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. यासाठी मुख्यमंर्त्यांना देखील भेटून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे तंत्रशिक्षण व नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी कल्याण … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही !

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणूसंसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या … Read more

आपला परिसर संतांची पावनभूमी : आ.राजळे

आपला परिसर हा संतांची पावन भूमी आहे. जीवन जगताना संतांचे आर्शिवाद खूप महत्वाचे असतात मंदिर बांधले गेलेच पाहीजेत मात्र देव -देवतांचे पावीर्त्य राखणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपण दिलेल्या मतदान रुपी प्रेमाची भरभराट त्याची उतराई म्हणून खारीचा वाटा उचलत भगवान विश्वकर्मां मंदिराचा सभा मंडप पूर्णत्वास नेऊ ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन पूर्तता करावी राजळे शब्द … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे बोल्हेगाव परिसराला आता शहराचा लुक

अहमदनगर : शहराचे विस्तारीकरण व्हावे, यासाठी शहराला जोडणारे रस्ते, विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडुन मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. बोल्हेगाव, नागापुर हा परिसर पुर्वी ग्रामपंचायतमध्ये होता. तो नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला आहे. या भागाच्या विकासाला मुलभूत प्रश्नांपासुन सुरूवात केलेली असून नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा परिसर वेगाने विकसित होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन या पुढील … Read more

कोरोना बाबत ‘फेक न्यूज’ दिल्याबद्दल संशयित महिलेसह दोघांना अटक

वृत्तसंस्था :- हंगेरी देशात कोरोना विषाणूमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे खोटे वृत्त प्रकाशित करणाऱ्या एका संकेतस्थळाचा भंडाफोड केल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. हंगेरीत अद्यापपर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खोट्या बातम्या देणाऱ्या एका संकेतस्थळाने अनेक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा दावा केला होता. काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त या संकेतस्थळावर देण्यात आले … Read more

कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार !

मॉस्को : कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या हुबेई प्रांतात झाल्याचे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे; पण रशियन माध्यमांनी या प्राणघातक विषाणूमागे पाश्चिमात्य राष्ट्रांचा विशेषत: अमेरिकेचा हात असल्याचा अजब दावा करून खळबळ उडवून दिली आहे. रशियाचे ‘चॅनल वन’ आपल्या ‘रेम्या’ (टाइम) नामक प्राइम टाइम कार्यक्रमात ‘कोरोना’वर चर्चा करत आहे. त्यात कोरोनाच्या प्रसारामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला … Read more

ट्रकने धडक दिल्याने मेंढपाळाचा मृत्यू

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात ट्रकने हजारवाडी येथील सायकलस्वार बाळू संभाजी हजारे (वय ५०) यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली. याबाबत मयताचे बंधू चिमाजी हजारे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माळेवाडी शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या चारी क्र. ७ … Read more

नगर- मनमाड रोडवर ट्रक लुटला

कोपरगाव :- नगर- मनमाड रोडवर कोपरगावपासून चार कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यानजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उभ्या आयशरची काच फोडून आत प्रवेश करून मध्यप्रदेशमधील खाचरोद येथील गाडीचे क्लीनर लाखनसिंग जगदीश परमार (वय २८) यांना धाक दाखवून त्यांच्याकडील ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेश येथील खाचरोद (ता. बदनावर, जि. धार) येथील … Read more