डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर :- कोल्हार-घोटी महामार्गावरील समनापूर चौफुलीवर खड्ड्यांमुळे ॲक्टिवावर बसलेली महिला खाली पडली. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. कवठे कमळेश्वर येथे राहणाऱ्या कमल लहू राजभोज (५०) नवीन ॲक्टिवावरून नातेवाईकासमवेत संगमनेर येथे बाजारासाठी जात होत्या. कोल्हार-घोटी महामार्गावर समनापूर चौफुली येथे खड्ड्यात दुचाकी आदळून त्या खाली पडल्या. पाठीमागून … Read more

सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे फॅक्टरी येथील सावकारांच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने बुधवारी विषप्राशन केले. त्याचा शनिवारी मृत्यू झाला.  दत्ता गणपत सुतार (वय ३५) हा तरुण शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करत होता. काही सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते. अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते फेडता येत नव्हते. सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील तीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अजित बाबुराव दुधाळ (कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आपण घरी एकटी असताना आरोपी आला. लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला … Read more

भाजी विक्रेत्याने चॉकलेटचं आमिष देऊन केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि 8 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी खेळत असताना उमाशंकर गुप्ता (वय 43) नावाच्या भाजी विक्रेत्याने चॉकलेटचं … Read more

राहुल ठाणगे लिखित ‘हृदयसंवाद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

अहमदनगर: कवी हा समाजाचा एक भाग आहे त्याने निरीक्षणातून समाजाच्या व्यथा जगासमोर मांडाव्यात असं मत दिग्दर्शक शशिकांत नजान यांनी व्यक्त केलं. नवोदित कवी राहुल ठाणगे लिखित हृदयसंवाद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळयात ते बोलत होते. प्रेमकविता लिहिणारा कवी काय आणि सामाजिक कविता लिहिणारा कवी काय तो आपल्या काव्यातून व्यक्त होत असतो . मुक्या भावनांना शब्दांतून वाट … Read more

मानसी नाईकचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

अभिनेत्री मानसी नाईकचा रांजणगाव येथील एका कार्यक्रमात विनयभंग करणाऱ्या तरुणाला रांजणगाव पोलिसांनी शनिवारी अटक केली. अजय अशोक कल्याणकर (२३, रा. हवेली, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर याला पुण्यातील स्वारगेट भागातून बेड्या ठोकण्यात आल्या. पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्याशी गैरवर्तन झाल्याची तक्रार मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. … Read more

कांदा @ १८०० रुपये

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर आता दोन हजारांपर्यंत आले आहेत. राहुरी बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात एक नंबर कांद्याला सरासरी १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. काही दिवसांपासून राहुरी बाजार समितीत कांद्याचे दर कमी होत आहेत. शुक्रवारी लिलावात एक … Read more

पदवीचा उपयोग समाज उभारणीसाठी करा : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :- पदवीचा उपयोग स्वत:बरोबरच समाज उभारणीसाठी करा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी स्नातकांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाचवा पदवीग्रहण समारंभ काळे महाविद्यालयात झाला. या वेळी आमदार काळे म्हणाले, जगाच्या पाठीवर एकूण लोकसंख्येच्या ४० ते ४५ टक्के युवा वर्ग आजमितीला कोणत्याही देशाकडे नाही. २०२० पर्यंत आपण देशाच्या प्रगतीचे स्वप्न पहात होतो. मात्र, हे … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण; जाणून घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती, किती धोकादायक?

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. या व्हायरसविषयी सातत्याने येत असलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण … Read more

राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत महाराष्ट्र सोडून जाणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच ठाकरे सरकार विश्वासघातकी असल्याने ते टिकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मुंबईत शनिवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचा १७ वा वर्धापन दिन फडणवीस यांच्या … Read more

रवींद्र जडेजाची अपयशी लढत; भारताने मालिका गमावली

ऑकलंड : प्रमुख फलंदाजांनी केलेल्या चुकांची किंमत शनिवारी भारतीय संघाला मोजावी लागली. यजमान न्यूझीलंडने हॅमिल्टनपाठोपाठ ऑकलंडमधील दुसरा सामनाही जिंकून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी ११ फेब्रुवारीला खेळला जाईल. याआधी झालेले पाचही सामने जिंकून भारतीय संघाने न्यूझीलंडला ट्वेण्टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० असा ‘व्हाईटवॉश’ देण्याचा पराक्रम केला. पण ती किमया त्यांना एकदिवसीय … Read more

असा जाईल तुमचा आजचा दिवस वाचा राशीभविष्य 8 फेब्रुवारी 2020

मेष :- आज धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.  व्यवसायात यशस्वी व्हाल. प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यशाचा असेल. वृषभ :-  आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई आज तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे.पैशांचं आगमन आज निश्चित आहे.  मिथुन :- : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही … Read more

शरद पवार यांच्या हत्येचा कट ? पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासह वेब पोर्टल विरोधात तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी​नगर पोलीस … Read more

रणबीर-आलियाचं शुभमंगल!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रणबीर आणि आलियाने चक्क लग्न करायचं मनावर घेतलंय आणि तेही याच वर्षी! यो दोघांचं रिलेशनशिप उत्तम असलं, तरी ते दोघं सध्या तरी करिअरकेड लक्ष देतील असं अनेकांना वाटत होतं, पण जर्नलिस्ट राजीव मसंद यांनी ‘ओपन मॅगझिन’साठी घेतलेल्या मुलाखतीत दोघांनी हे गुपित उघड केलंय. डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा दोघांचा विचार असून घरच्यांशीही … Read more

कोरोना व्हायरसमुळे चायनीज आणि चिकन ला बुरे दिन

करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. नागरिकांनी चिकन घेणे कमी केले आहे. या दिवसात चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे. चीनसह अन्य देशांत फैलावलेल्या करोना व्हायरसची नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटी चायनीज फास्ट फूडची मागणी घटली आहे.  नागरिकांकडून चायनीज फूड खाणे टाळले जात आहे. त्यामुळे चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी कमी झाली … Read more

‘बोनस’मधील रॅप गाणे ‘माइक दे’ झाले रिलीज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मराठी चित्रपट ‘बोनस’ २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी कलावंत गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘बोनस’ या चित्रपटाचे ‘माइक दे’ हे रॅप गाणे प्रेक्षकांसाठी नुकतेच रिलीज करण्यात आले.   हे गाणे रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. ऋषिकेश जाधव आणि एम. सी. आझाद यांनी गायले आहे. … Read more

राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्या. – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्‍ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्‍ला पुरोगामी महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्‍य सरकारने दोषी व्‍यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा आणि राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, नाशिक जिल्‍ह्यातील … Read more