तो नरभक्षक बिबट्या सापडेना…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब, फत्याबाद, कुरणपूर, उक्कलगाव, पिंपळगाव शिवारात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन बालकांचा बळी घेत कित्येक पाळीव प्राण्यांचा फडशाही त्याने पाडला आहे. गणेशोत्सवात कडीत येथील दर्शन देठे हा मुलगा आरती करून चुलतीबरोबर घरी येत असताना उसात दबा धरून बसलेल्या … Read more

भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. नगर तालुक्याबरोबरच जामखेड तालुकाध्यक्षदी अजय काशीद व पारनेर तालुकाध्यक्षपदी वसंतराव चेडे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपच्या दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी ही नियुक्ती केली आहे. नगर तालुकाध्यक्षपदावर नियुक्त झालेले मनोज कोकाटे यांनी यापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाचे काम पाहिले … Read more

धक्कादायक : माजी नगरसेवकावर ऑईल चोरीचा गुन्हा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडाणशिवे यांच्यासह अमोल जिजाराम साबळे, दीपक दिलीप जाधव, राजू बबन दिवडे, विकास भाऊसाहेब उडाणशिवे व इतर तिघांच्या (सर्व रामवाडी) विरोधात ऑईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवी मुकुंदलाल अबट (५८, औरंगाबाद रोड, बीटीआर गेटसमोर, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.  आरोपींनी पत्र्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : श्रीरामपूरच्या तरुणाची युवकाची गोळीबारातून हत्या,आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूरच्या फरदीन आब्बू कुरेशी या युवकाला बळजबरीने नाशिक येथे नेऊन व नंतर लोणी येथे आणून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. यागुन्ह्यातील पसार असलेला आरोपी उमेश भानुदास नागरे (वय- 33 रा. लोणी ता. राहाता) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेेरबंद केले आहे.  या गोळीबार प्रकरणात यापूर्वी सिराज उर्फ सोल्जर आयूब … Read more

या पोरीचा कोणी नाद करायचा नाय, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील एका अल्पवयीन मुलीस करण अर्जुन सांगळे (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) याने भर रस्त्यात अपमानास्पद वागणूक दिल्याने त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मी शाळेतून घरी … Read more

प्रेमसंबंध ठेव म्हणत प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली.  प्रेयसीवर धारदार सुऱ्याने वार करून फरार … Read more

‘संजू तू हल्ली बरा बोलतो, येतो का पक्षात? – राज ठाकरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराला व्यासपीठावरुनच पक्षात येण्याची ऑफर दिली. झील संस्था आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इंक अलाईव्ह या कार्यशाळेचं आयोजन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे आपलं मनोगत व्यक्त करताना व्यंगचित्रकाराला ‘येतो का पक्षात?’ असं म्हणाले आणि सभागृहात एकच हशा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या मदतीने विवाहित तरुणीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे राहणारा आरोपी बाबासाहेब लक्ष्मण छत्रे याने त्याची पत्नी संगिता हिच्या मदतीने एका २७ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीवर त्याच्या शेतात इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच यातील आरोपी बाबासाहेब छत्रे व त्याची पत्नी संगिता यांना दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. या कारणातून संगिता हिने नवरा बाबासाहेब … Read more

रोजगार व ग्रामीण विकासासाठी शिव महारोजगार व शिवतळे योजना जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगार देण्यासाठी शिव महारोजगार योजना तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिवतळे योजना जाहीर करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेंरा अपना घर आंदोलन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली. तर घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी राज्य सरकारने रुर्बन व्हॅल्यु क्रियेशन अ‍ॅण्ड कॅप्चर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप स्किम योजना स्विकारण्याचा … Read more

डॉ.विखे अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल टीम मेक्ट्राच्या इलेक्ट्रीक वाहनास भारतात तिसरा क्रमांक

अहमदनगर: वाढती लोकसंख्या, वाढती वाहने याच्या तुलनेत पेट्रोल व डिझेलचे मर्यादित साठे शिल्लक राहत असून, वाढती गरज लक्षात घेता भारत सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले. डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या ‘टीम मेक्ट्रा’ ने  बनविलेल्या इलेक्ट्रीक वाहनास महाराष्ट्रात दुसरा तर  भारतात तिसरा … Read more

काँग्रेसच्या नेत्याने केली मुलाची गोळी झाडून हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोला: वडिलांच्या तक्रारीवरूनच आपल्याला पोलिसांनी तडीपार केले, अशा संशयावरून मुलाने वडिलांशी वाद घातला. दोघांत झालेल्या झटापटीत वडिलांनी मुलावर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात मुलाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुलगा गुंड प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीय त्याला त्रस्त होते. ही घटना अकोल्यातील जठारपेठेत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. मनीष भारती (४०) असे मृत मुलाचे … Read more

अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री एक दहशतवादी आहेत. ते लोकांना निरागस चेहरा करून विचारतात, मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात ते दहशतवादीच आहेत असे जावडेकर म्हणाले … Read more

आ.संग्राम जगताप महाविकास आघाडी धर्म पाळणार की भाजपला पुन्हा बाहेरून ताकद देणार ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नगर शहरातील पोटनिवडणुकीतही राबवण्यात येत आहे. प्रभाग सहामध्ये एका जागेच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आमदार जगताप यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते मात्र गैरहजर होते. नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, विजय पठारे, … Read more

के के रेंज विस्तारीकरणाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील के. के. रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींसंदर्भात पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अँड स्कूलचे लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल वाधवान यांनी रेंज एक व दोनमध्ये समाविष्ट जमिनींविषयीची … Read more

ट्रकखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोळपेवाडी साखर कारखान्याच्या गट ऑफिससमोर हा अपघात झाला. संजय रघुनाथ चव्हाण (वय ३९, कोळपेवाडी) हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकची (एम एच १७ ए ६०८९) त्यांना धडक बसली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नानासाहेब रघुनाथ … Read more

प्रवरा पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अवसायनात निघालेली पूर्वश्रमीची रावसाहेब पटवर्धन व आताची प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकानी राजीनामे दिलेले आहेत , त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळणे अवघड झाले आहे. सदर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निवेदन द्वारे संचालकांवर (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण) अंतर्गत गुन्हे करावेत, अशी मागणी ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सहकार विभागाचे जिल्हा उपनिंबधक दिग्विजय … Read more

अजित पवारांच्या ‘कारखान्याचे’चे दूषित पाणी ओढ्यात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका साखर कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा पुढे भीमा … Read more

धक्कादायक: शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वर्धा : हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधामाला अखेर अटक केली आहे. विक्की नगराळे असे या आरोपीचे नाव असून त्याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली आहे. हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला … Read more