बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार ! 

कोटा : राजस्थानमध्ये बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्यासोबत लग्न करणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववीच्या वर्गात शिकणारी ही १५ वर्षीय मुलगी बुधवारी शाळेतून परत येत होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या काही व्यक्तींनी तिचे अपहरण केले. या लोकांमध्ये पीडितेसोबत बालविवाह करणाऱ्या २० … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी … Read more

महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही … Read more

वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन, फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड … Read more

लष्करात खोटी कागदपत्रे देवून सैन्यदलाची फसवणूक

अहमदनगर : लष्करात भरतीच्यावेळी खोटी कागदपत्रे सादर करुन सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी कोमलप्रसाद पन्नालाल शर्मा रा.बिसारा जि.सीतापूर,उत्तरप्रदेश याच्या विरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,एमआयआरसी सेंटर येथे दि.१ जुलै ते दि. २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कोमलप्रसाद शर्मा याने लष्करात भरतीच्यावेळी रहिवासाची खोटी कागदपत्रे सादर करुन … Read more

दारूची तलफ कमी करायची असेल तर हे नक्की वाचा !

लंडन : दारूची तल्लफ कमी करण्याचे नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे त्यांनी असा दावा केला आहे की, दररोज व जास्त प्रमाणत मद्यसेवन करणाऱ्या लोकांना केटामाइन औषधाचा एक डोस देऊन त्यांची मद्याची तल्लफ उल्लेखनीय रुपात कमी केली जाऊ शकते. नेचर कम्युनिकेशन नियतकालिकामद्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनानुसार, केटामाइनच्या एका डोसामुळे अति जास्त प्रमाणात … Read more

सोशल मीडिया वाढवितोय किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य !

लंडन : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्यात नुकसानकारक ठरते. सध्याच्या आधुनिक काळात सोशल मीडिया, संगणक आणि टीव्हीने लोकांचे जीवन अतिशय सुलभ केले आहे. दुसरीकडे त्यांचा जास्त प्रमाणातील वापर आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चार वर्षांच्या कालावधीत सोशल मीडिया, टीव्ही आणि संगणकाचा अति वापर केल्यामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणे … Read more

आरोपींनीच केली स्कुटी पंक्चर,ट्रकमागे केला बलात्कार प्रियंका रेड्डी हत्याप्रकारणाबाबत धक्कादायक माहिती समोर !

वृत्तसंस्था :- हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी या 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या  हत्येप्रकरणी साईराबाद पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर सहित क्लीनर अशा चार लोकांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद पाशा नावाचा मुख्य  संशयित आरोपी सुद्धा पकडला गेला आहे. पाशा हा … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. पुलाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार … Read more

मोटारसायकलच्या अपघातात तरूणीचा मृत्यू

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे – नगर महामार्गावरील हॉटेल कुणालसमोर झालेल्या मोटारसायकल अपघातात पायल प्रशांत माळवे (वय -२३ रा. हुडको कॉलनी शिरुर जि.पुणे) यांचा मृत्यू झाला.  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३ रोजी दत्तात्रय मधुकर काजळे (रा .अकोले जि.अहमदनगर) यांच्या मोटारसायकलवर पायल प्रशांत माळवे ही डबलशीट शिरूरकडे जात असताना सुप्या जवळ अचानक कुत्रे … Read more

निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

राहुरी :- मतदारसंघातील जनतेने दोन वेळा निवडून दिले. त्यामुळे मतदारांवर आपण कधीच रोष व्यक्त करणार नाही. सरकार कुणाचेही असो, सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू. जनतेशी जोडलेली आपुलकीची नाळ कदापि तोडणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते.  कर्डिले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची चिन्हे

वृत्तसंस्था :- राज्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहण्याची तसेच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

महापालिका भरणार प्रदूषण मंडळाकडे एक कोटी रुपये

अहमदनगर : हरित लवादाच्या आदेशानुसार बुरुडगाव येथे बायोमिथेनायझेशन प्लांट अॉक्टोबरपर्यंत उभारण्यात महापालिकेला अपयश आले.  याप्रकरणी हरित लवादाने एक कोटींची परफॉरमन्स गॅरंटीची रक्कम प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे भरण्याचे आदेश महिनाभरापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. पुढील महिन्यात लवादाची सुनावणी असून तत्पूर्वी १ कोटींची रक्कम भरणा करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा एक कोटीचा दणका बसला … Read more

आमदार रोहित पवारांची मंत्रिमंडळात वर्णी लावा

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सर्वात मागास व दुष्काळी मतदारसंघ आहे. या वेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व रोहित पवार यांच्या रूपाने लाभले आहे.  मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात वर्णी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली. फक्त सत्ता असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन विकासात्मक … Read more

अजित पवारांना भाजप प्रवेशाची ऑफर !

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांना भाजप प्रवेशाची ऑफर आलीय जर उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्यांनी भाजपसोबत यावं. आपण मिळून सरकार चालवू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवारांनी अभ्यास न करता भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. जर हे सरकार … Read more

या मतदार संघातून उद्धव ठाकरे लढविणार निवडणूक

मुंबई :- अखेर महाविकासआघाडीचे सरकार राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर स्थापन होत सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सत्तापेच सुटला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले आहे. मात्र उद्धव ठाकरे हे निवडून आलेले आमदार नसल्याने आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्यपद मिळवणे गरजेचे आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे … Read more