या मतदार संघातून उद्धव ठाकरे लढविणार निवडणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :- अखेर महाविकासआघाडीचे सरकार राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर स्थापन होत सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सत्तापेच सुटला

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले आहे. मात्र उद्धव ठाकरे हे निवडून आलेले आमदार नसल्याने आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्यपद मिळवणे गरजेचे आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरून आमदार होणार असल्याची शक्यता असून त्यासाठी ते यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढवू शकतात,उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ मतदारसंघात तशी चाचपणी सुरु केली आहे. 

यवतमाळ मतदारसंघात एकूण 439 मतदार आहेत. मागील वेळी येथून शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 378 मतं मिळाली होती. तनाजी सावंत यांनी ही जागा जिंकल्यामुळे या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.

हा मतदारसंघ सुरक्षित असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथून उभे राहावे, असा सल्ला शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीदेखील हिच मागणी आहे. 

Leave a Comment