Lok Sabha 2024 : भोंग्यावरील प्रचार कमी झाला ! सोशल मीडियाचा वापर वाढला

Ahmednagarlive24 office
Published:

सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपांनी आखाडा चांगलाच तापला आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. पारंपारिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे.

सोशल मीडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. केवळ एका क्लिकने लाखो लोकांपर्यंत पोहचण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध झाली. फेसबुक, व्हाट्स अॅप, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून उमदवारांचे समर्थक पोस्ट टाकल्या जात असल्यामुळे सोशल मीडिया निवडणुकीत प्रचारदूत बनला आहे.

राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकण्याचा सपाटा सुरु आहे. आज सोशल मीडिया प्रचारासाठी एकमेव साधन म्हणून पुढे आले आहे. डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे प्रचाराचे नियोजन बदलले आहे. भोंग्यावरील प्रचार कमी झाला असून, सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.

शहरांसह खेडोपाडी, वाडी-वस्त्यांवरील लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींच्या हाती मोबाईल दिसून येत आहेत. त्यातच इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्याने आजसोशल मीडियाचा वापर सर्रास होत आहे. व्हाट्स अॅप ग्रुपवर लोकसभा निवडणुकीचे वादळ मोठ्या प्रमाणात घुमताना दिसत आहे.

मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात घेतलेल्या सभा या माध्यमातून जनतेपर्यंत सहज पोहचविल्या जात आहेत. सोशला मीडियालादेखील आचारसंहितेचे नियम लागू करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावर जोमाता सुरु असल्याने राजकीय सभा, रॅली, बैठकांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता असल्याने प्रचारात रंगत आल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीणा भागातही सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात? याकडे नागरिकीचे लक्ष वेधले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe