काँग्रेसमधील गटबाजी अखेर चव्हाट्यावर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अंतर्गत गट-तटांच्या राजकारणाला कंटाळून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या स्टार उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  उर्मिलांच्या राजीनाम्यावरून मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात आता जुंपली आहे. देवरा यांनी ट्विट करून उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत, असे म्हणत निरुपमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा … Read more

आता याला काय म्हणाव ? लुंगीवर गाडी चालवल्यास चारपट दंड !

लखनौ : लखनौमध्ये जर तुम्ही बरमुडा, शॉर्ट्स अथवा लुंगी घालून गाडी चालवली तर तुम्हाला चारपट दंड भरावा लागेल. यासंदर्भात वाहतूक पोलीस अधीक्षकांनी नवीन फर्मान काढले आहे.  याअंतर्गत मोठे आणि जड वाहन चालवताना जर वाहतूक ॲक्टच्या नियमानुसार कपडे घातले नाहीत, तर नवीन दराने दंड वसूल केला जाणार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक म्हणाले की, गाडी चालवणाऱ्यांसाठी विशेष … Read more

दंड वाचवण्यासाठी दुचाकी चालकाने हेल्मेटसोबत केले असे काही….

वडोदरा : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जात आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  यात एक ५० वर्षीय दुचाकी चालक हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवून प्रवास करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.. दुचाकी चालकाचे रामपाल शाह असे नाव असून, ते … Read more

विम्याचे पैसे मिळावे म्हणून त्याने दिली आपल्याच हत्येची सुपारी !

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील मंगरोप ठाण्याच्या हद्दीत आर्थिक अडचणींमुळे त्रासलेल्या एका फायनान्सरने आपलीच हत्या करण्यासाठी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे.  विम्याचे ५० लाख रुपये आपल्या कुटुंबाला मिळावेत, यासाठी फायनान्सरने हे पाऊल उचलल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. बलबीर खारोलने अनेक जणांना २० लाख रुपये उसने दिले होते. उसने दिलेली ही … Read more

प्लास्टिक बाटल्या द्या मोबाईल रिचार्ज मिळवा !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यानुसार जर प्रवाशांनी टाकाऊ बाटली स्थानकावरील क्रशिंग मशिनमध्ये टाकली तर त्यांना मोफत मोबाईल रिचार्ज करून दिला जाणार आहे. परंतु हा रिचार्ज नेमका किती रुपयांचा असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. … Read more

मोबाइल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

नागपूर बाजार आणि गर्दीच्या ठिकाणांवर लोकांचे मोबाइल हँडसेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर पोलिसांची छडा लावला असून झारखंडमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळीतील सदस्यांना त्यांच्या कामगिरीनुसार चक्क पगार दिला जायचा, अशी माहिती नागपूर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. नागपुरात मागील काही महिन्यांत सार्वजनिक ठिकाणांवर लोकांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या.  या चोऱ्यांचा छडा लावताना पोलिसांनी … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, … Read more

दोन-तीन दिवसांत होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक … Read more

शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्राला संधी द्या…

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना सोडून भाजपतील मोठा गट राऊत यांच्या गळाला लागल्याने मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे. उमेदवारीसाठी प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत हे दोघे दावेदार झाल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र … Read more

आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…

श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच … Read more

आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे…यशवंतराव गडाख यांचे कार्यकर्त्याना भावनिक आवाहन

नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.  माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. गडाख अलीकडेच आजारपणातून … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्या विरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे न दिल्याच्या निषेधार्थ आलेश्वर (ता.परांडा) येथील शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी हे साखर आयुक्तालय,पुणे येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्तांना शेतकर्‍यांनी दिले आहे. परांडा तालुक्यातील आलेश्वर, बंगाळवाडी, गोसावीवाडी डोंजा … Read more

माजी आ. शंकरराव गडाख ‘या’ पक्षाकडून लढणार विधानसभा !

नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्‍यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही … Read more

आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले!

नेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.  वडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला. तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक

नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला … Read more

काँग्रेस १११ तर राष्ट्रवादी १०४ जागा लढण्याची शक्यता

नवी दिल्ली : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यात आघाडीची अधिकृत घोषणा करण्याविषयीसुद्धा पवार व सोनिया यांच्यात खलबते झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात … Read more

लग्न मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी !

पालनपूर :- शहरात एका तरुणाचे लग्न मोडले. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेतच त्याने पोलिसांच्या समोरच इमारतीवरून खाली उडी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वासणा गावातील राहुल वाल्मिकी (२१) याचे लग्न ठरले होते. परंतु नियोजित वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी तो शहरातील डॉक्टर्स हाऊस भागातील एका इमारतीवर आत्महत्या … Read more