ताेडगा काढण्यासाठी साेनिया गांधी सक्रिय!

नवी दिल्ली :- मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात जाेरदार वादाला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सुटावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दुसरे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावले आहे.  विशेष म्हणजे हा वाद चिघळू नये म्हणून सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळे बोलावले आहे. सोनिया गांधी … Read more

राष्ट्रवादीनेच केले महाराष्ट्राचे वाटोळे!

अहमदनगर – राज्यात युती सरकारने मोठी भरीव विकास कामे केलेली आहेत. 10-15 वर्ष राज्यात सत्तेत असणार्‍यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही. साकळाई योजना फक्त विखेच करु शकतात असे सांगत विखे पाटील परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. उमेदवारीसाठी त्यांच्याकडे माणसे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉ. … Read more

प्रकाश आंबेडकरांकडून जनतेची दिशाभूल !

मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.  आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे … Read more

विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही : आ. राजळे

शेवगाव : आपल्याविरुद्ध बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने सध्या ते सोशल मीडियावर काही लोकांमार्फत टीका -टिपण्णी करत आहेत. कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे लक्ष देऊ नये. आगामी निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची व सन्मानाची आहे, असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले. तालुक्यातील शहरटाकळी येथे दहिगाव ने पंचायत समिती गणातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्ता मेळावा … Read more

पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर जाहीर

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गृहविभागाच्या पोलीस भरतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. दि. ३ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून दि. २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे. प्रथमच भरतीप्रक्रियेत गृहविभागाच्या वतीने मोठे बदल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच ही भरती होणार आहे. राज्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परिक्षेत्रात भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा होणाऱ्या … Read more

दोन तोंडाचा दुर्मिळ साप सापडला !

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या जंगलांमध्ये एका पर्यावरण सल्लागाराला विचित्र रुपाचा दुर्मिळ साप आढळून आला. हा साप पाहून तो थक्कच झाला. कारण सापाला चक्क दोन तोंडे आहेत. बर्लिंग्टन काउंटीतील हर्पेचोलॉजिकल असोसिएट्ससाठी काम करणाऱ्या दोन लोकांनी हा साप पकडला असून त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सापाला आता डेव असे नाव देण्यात आले आहे. कारण … Read more

पारनेर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका !

पारनेर :- तालुक्यातील वाळू तस्करांना पारनेर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील शिरसुले, शिक्री व कान्हूर पठार या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून सुमारे ६० लाख २८ हजार ६००रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर अवैध वाळू तस्करी प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील नदीसह अनेक ओढ्या नाल्यातून देखील वाळू … Read more

शिर्डी परिसरातील गुलाबाला गुजरातमध्ये मोठी मागणी

राहाता : तालुक्यातील शिर्डी परिसरातील निमगाव कोऱ्हाळे, निमशेवडी, नांदुर्खी, सावळीविहीर, तिसगाव, चोळकेवाडी, अस्तगाव या सात गावांत मोठ्या प्रमाणावर गुलाब शेती केली जाते. या गुलाबाला जशी शिर्डी शहरात मागणी असते, तशी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातदेखील चांगली मागणी झाली आहे. शिर्डी शहरात काही शेतकरी जागेवर गुलाबाची फुले विकत आहेत. त्या व्यतिरिक्त सुमारे दोन लाख गुलाबाचे पॅकेट रोज बाहेरच्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती. याचवेळी … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, तालुक्यातील भंडारदरा धरणातून ३४ हजार १२५ क्यूसेक, तर निळवंडे धरणातून २८ हजार १९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अकोले तालुक्यात पावसाची संततधार सर्वदूर सुरूच असून मुळाखोरे, आढळा खोरे, प्रवरा खोऱ्यासह भंडारदरा पाणलोट क्षेत्रात … Read more

पबजी खेळू न दिल्याने वडिलांचे तुकडे करून हत्या !

बेळगाव : वडील आपल्याला पबजी खेळू देत नाहीत, याचा राग आल्याने चिडलेल्या एका निर्दयी मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांवर हल्ला चढवत त्यांचे तुकडे करून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे कर्नाटकातील बेळगावधील काकती येथे घडली आहे. याप्रकरणी रघुवीर कुंभार नामक तरुणास अटक केली आहे.कर्नाटकातील बेळगावमधील काकती येथे असलेल्या सिध्देश्वरनगरात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. … Read more

मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …

कर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले. कर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती … Read more

बापूंना जाऊन एक वर्ष झाले, तरी त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत…

श्रीगोंदे ;- बापूंनी आयुष्यभर पुण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर आणि कामांवर प्रेम करणारा समाज आज येथे उपस्थित आहे. बापूंचे कार्य आणि नाव सदैव तेवत राहील असे काम करूया, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटील बोलत होते. बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना ‘नागवडे’चे … Read more

पिचड यांंच्या विरोधात माकप लढणार : डॉ. अजित नवले

अकोले :- पराभवाची भीती आणि राजकीय लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेही पिचडांसोबत भाजपत गेले. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगावी संघटन असलेला माकप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक आहे. माकप संपूर्ण ताकदीने या विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेप करून राजकीय तत्त्वनिष्ठता आणि पावित्र्याची जपवणूक करण्यात आघाडीवर राहील, असे … Read more

नगर-पुणे महामार्गावर अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

पारनेर :- नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात झालेल्या अपघातात अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे सव्वाच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले आहेत. लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला. जखमींमध्ये किसन … Read more

आनंदाची बातमी : एसबीआयचे कर्ज पुन्हा स्वस्त…

दिल्ली :- देशातील स‌‌र्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ट लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये १० मूळ अंकांची (०.१० %) कपात केली आहे. बँकेने सलग पाचव्यांदा कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. या कपातीमुळे बँकांच्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. … Read more