अति घाईत खाल्ल्यामुळे गमवावा लागला जीव!

न्यूयॉर्क : काही लोक तासन्तास एकाच जागी बसून टीव्ही पाहत घालवतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय अशा लोकांसाठी म्हातारणात हिंडण्याफिरण्याच्या समस्येचा धोका तिपटीने वाढवते, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. या अध्ययनात ५० ते ७१ वयोगटातील निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला होता. सुमारे दहा वर्षे त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात … Read more

‘बबनराव मी कायम रिचेबलच असतो’ हर्षवर्धन पाटील यांचे पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर

श्रीगोंदा : स्व.शिवाजीराव (बापू)नागवडे यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली.कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रपंच बापूंनी उभे केले. सहकारातही बापूंचे सिंहाच योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सहकारी साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संस्थापक श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांच्या प्रथम … Read more

सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे – ना.प्रा.राम शिंदे

जामखेड : मला अतिशय आनंद होतोय की, आपल्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा हेतूने आजचा दिवसाचे विशेष महत्व आहे. कारण मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध … Read more

कॉफी पित्ताशयातील खड्यांचा धोका कमी करते !

लंडन : शरीर व मनाला तरतरी देणाऱ्या कॉफी सेवनाचा आणखी मोठा लाभ समोर आला आहे. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून कॉफी आणि पित्ताशयात तयार होणारे खडे यांच्यात संबंध असल्याचे आढळून आले आहे. सुमारे एक लाख चार हजार लोकांवर करण्यात आलेल्या या अध्ययनामध्ये असे दिसून आले की, दररोज सहा कपांपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये कॉफी न पिणाऱ्यांच्या … Read more

फेसबुक आता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही करणार मदत !

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही मदत करणार आहे. फेसबुकने नुकतीच २० देशांमध्ये डेटिंग सेवा सुरु केली. मे महिन्यामध्ये पार पडलेल्या वार्षिक परिषदेमध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखविला होता. त्यानंतर दोन महिन्यांत फेसबुकची ही सेवा सुरू झाल्याची माहिती झकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार … Read more

तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यास अटक

पुणे : तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका भागविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मयूर दुर्योधन लोंढे (वय २१, रा. बरड, जि. सातारा) असे कोठडी दिलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय महिलेची सुटका केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे आण्णा दिलीप माने यांनी फिर्याद … Read more

ब्लड प्रेशर कमी करण्याचा उपाय नक्की वाचा

वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यात इतर कुठल्याही मार्गापेक्षा योग अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, असं नव्या संशोधनात आढळून आलं आहे.   ब्लडप्रेशर किती कमी करता येईल, याचा अभ्यास करण्याकरिता नेहमीच्या औषधांबरोबरच किंवा पर्याय म्हणून ध्यान, योग आणि गाइडेड इमेजरी या पद्धतींचा वापर करण्यात आला. यात योग सर्वांत प्रभावी असल्याचं लक्षात आलं. या तिन्ही पद्धतींनी मिळून सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी ११.५२ … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी निवडणुकीवर बहिष्कार !

शेवगाव :- तालुक्यातील आव्हाणे बु. ते रामनगर, या रस्त्याची अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी दिला आहे. आव्हाणेपासून जवळच असणाऱ्या रामनगर येथे एक हजार लोकवस्ती असून, दळणावळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक बंदी यासह अनेक धडाकेबाज निर्णय घेत केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. तसेच सामान्य नागरिकांना प्रत्येक स्तरावर बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली, अशा शब्दांत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारचा लेखाजोखा रविवारी जनतेपुढे मांडला आहे. मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण … Read more

संसर्गजन्य रोगावर हे आहेत सोपे उपचार…

आयुर्वेदात सहा ऋतूंचं वर्णन केलेलं आहे व या सहा ऋतूंमध्ये स्वास्थ्य टिकविण्यासाठी आहारविहार कसा असावा यासंदर्भात पण विस्तृत विवेचन केलेलं आहे. हे सहा ऋतू : वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म.उन्हाळ्यातील उष्णतेच्या त्रासामुळे प्रत्येक प्राणी वर्षाऋतूची आतुरतेनं वाट बघत असतो. वर्षाऋतू जरी मनोहारी वाटत असला, तरी स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून बरेचदा त्रासदायक ठरतो. वर्षाऋतूत प्रधानत: ज्वर … Read more

….तर देश मंदीच्या खाईत लोटला जाईल

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून मोदी सरकारने मौन बाळगले असून देशातील बिकट परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा प्रहार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून केला आहे. कंपन्या बंद पडत आहेत, व्यवहार ठप्प झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, १०० दिवसांत विकास न घडविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला राहुल गांधी … Read more

भाजपमध्ये कोणीही येऊ द्या , पण श्रीगोंद्याच्या उमेदवारीची शिफारस बबनराव पाचपुते यांचीच : खा. डॉ. सुजय विखे

श्रीगोंदा :- भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात मला चांगले माताधिक्य मिळवून दिले , त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार , असे  खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले. पंचायत समितीचे सभापती शहाजी हिरवे यांनी खेतमाळीसवाडी ( पारगाव ) येथे आयोजित केलेल्या माजी … Read more

दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे !

कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे. कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. महासंग्राम युवा मंच हे नामदेव … Read more

नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

दारु पिऊन रिक्षा चालवणे पडले महागात, तब्बल ४७ हजारांचा दंड !

भुवनेश्वर ;- नवीन मोटर वाहन कायद्यात बदल झाल्यानंतर दारु पिऊन रिक्षा चालवणे चालकास चांगलेच महागात पडले. भुवनेश्वरात पोलिसांनी रिक्षा चालकावर या नियमाचा भंग केल्याने ४७ हजार ५०० रुपये दंड लावला. याच प्रकारे हरियाणातील गुडगावात रिक्षा चालकावर ३२ हजार रुपये दंड लावला आहे. तर ट्रॅक्टर चालकावर ५९ हजाराचा दंड लावण्यात आला. पोलिसांनी त्याला सामान्य नियम तोडल्याबद्दल … Read more

फोन कसा पाहतात याचा सेक्स व उंचीवर परिणाम !

न्यूयाॅर्क :- लोक मोबाइल अथवा अन्य उपकरणे कसे हाताळतात किंवा पाहतात याचा सेक्स व उंचीवर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. अमेरिकेत फोन-टॅबलेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता डेस्कटॉप अथवा लॅपटॉप हाताळणाऱ्याच्या तुलनेत मान वळवणे व झुकवण्याची पद्धतीही वाढल्या आहेत, असे संशोधन जर्नल क्लिनिकल अनॉटॉमीमध्ये प्रकाशित झाले आहे. यानुसार अरकन्सास विद्यापीठातील संशोधनकर्त्यांनी … Read more

आ.भाऊसाहेब कांबळेंनी स्व.जंयतराव ससाणेंना फसविले !

श्रीरामपूर :- काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग दोन वेळा आमदार करण्यासाठी स्व. जंयतराव ससाणे यांनी प्रयत्न केले. पंरतु ससाणे यांनादेखील आ. कांबळे यांनी फसवले. स्व. ससाणे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज होते. त्यांनी लोकसभेला उघड आमदार कांबळेंविरुध्द काम केलं. लोकसभा निवडणूक आमदार कांबळे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची साथ घेत निवडणूक लढवली. पंरतु … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश … Read more