गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा – आ.शिवाजी कर्डिले

राहुरी :- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझ्या राजकारणाला दिशा मिळाली, त्यांच्यामुळेच राहुरी मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी मिळाली व पाचव्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनीदेखील राहुरी मतदारसंघासाठी भरीव निधी देऊन मुंडे -कर्डिले कुटुंबाचे ऋणानुबंध जोपले, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, देवराई, घाटशिरस येथील विविध … Read more

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या … Read more

नगर जिल्ह्यातील या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर :- काही पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या. बदली झालेले अधिकारी, ठिकाण पुढीलप्रमाणे : गोकूळ औताडे – वाचक उपअधीक्षक कार्यालय शिर्डी, अरुण परदेशी – नगर सायबर ठाणे, पांडुरंग पवार- वाचक पोलिस अधीक्षक कार्यालय, हनुमंतराव गाडे- साई मंदिर सुरक्षा शिर्डी, प्रवीणचंद लोखंडे – आंर्थिक गुन्हे शाखा, दीपक गंधाले – प्रभारी शिर्डी, सुभाष घोये – … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरेच घेणार युतीचा निर्णय

अहमदनगर :- शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे घेतील. आम्ही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत तयारी केली आहे. ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांचा अहवाल प्रदेशला पाठवण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी बुधवारी दिली. भाजप इच्छुकांच्या मुलाखती आंबटकर यांनी घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more

नेत्यांनी सोडले तरी जनता काँग्रेसच्या पाठिशी

शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे … Read more

बाळासाहेब थोरतांपुढे पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान

नेवासा – कॉंग्रेस पक्षाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नेते प्रयत्नशिल आहेत. मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे खुर्च्या उबविणाऱ्या नेत्यांच्या काळात नेवासा तालुक्‍यात पक्षाला पदाधिकारी शोधण्याची वेळ अली आहे. त्यामुळे ना नेते ना कार्यकर्ते, कॉंग्रेस चाचपडते भलतीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेवाशात पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगर जिल्ह्यातील असले, तरी नेवाशात पक्षाची … Read more

गरज पडली की बारामतीत यायचं सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

स्मार्टफाेन खरेदी करण्यार असाल तर हे नक्की वाचा…

जर तुम्ही स्मार्टफाेन खरेदी करण्याची याेजना आखत असाल तर या सणासुदीच्या हंगामात तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या वर्षात सणासुदीच्या काळात सॅमसंगपासून Apple पर्यंत आणि शाओमीपासून व्हिवाेपर्यंत अनेक बड्या कंपन्या नवीन फाेन बाजारात आणणार आहेत. वेगवेगळ्या अहवालानुसार या मंदीच्या वातावरणातही स्मार्टफाेन कंपन्या ७५ नवीन स्मार्टफाेनचे माॅडेल्स बाजारात आणण्याची तयारी करीत आहेत. इंडस्ट्री इंटिलिजन्स ग्रुपचे प्रमुख प्रभू राम … Read more

घरकुल घोटाळ्यातील सुरेश जैन व सर्व ३८ आरोपी नाशिक कारागृहात!

जळगाव: घरकुल घाेटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्या ४८ पैकी ३८ आराेपींची मंगळवारी दुपारी १ वाजता नाशिक जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात  आली. यात सुरेश जैनांसह इतरांचा समावेश आहे. तसेच अन्य दहा आराेपींची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आराेपींना नाशिक कारागृहात नेण्याची प्रक्रिया नियमानुसार करण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृहातर्फे देण्यात आली. तसेच रुग्णालयातील दहा जणांनाही उपचारासाठी नाशिक कारागृहात … Read more

अमित शहा यांनी दिला चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणूक न लढविण्याचा सल्ला!

सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात न उतरण्याचा सल्ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. राज्यभरात पडद्याआडच्या भूमिका प्रभावीपणे निभावण्याच्या शैलीमुळे चंद्रकांत पाटील यांची रणनीती विधानसभा निवडणुकीत उपयोगी येणार आहे. त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढवू नये, अशी सूचना त्यांना शहा यांनी केल्याचे मानले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपसाठी … Read more

महिला रुग्णालय, अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी पाठपुरावा: तांबे

संगमनेर : शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांच्या निरोगी आरोग्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. महिलांसाठी कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत महिला रुग्णालय आणि अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर प्रस्तावित असून त्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत बैठका झाल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. शहरातील महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, यासाठी नगरपरिषदने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये शासनाकडे प्रस्ताव … Read more

विघ्नसंतोषींनी सीना सुशोभीकरणाचे काम बंद पाडले : संग्राम जगताप

नगर : शहरातील विद्युत पोलवरील तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती. परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी करून हे काम बंद पाडले. नंतर याच लोकांनी आमदार झाल्यावर सीना नदीच्या याच सुशोभीकरणाच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज … Read more

गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपीना अटक

नेवासे – गावठी कट्ट्यातून गोळीबार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. प्रताप यल्लप्पा फुलमाळी व सचिन ऊर्फ बप्पा साहेबा फुलमाळी (दोघे घोडेगाव) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी भारत सोपान कापसे (कांगोणी, ता. नेवासे) याला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सचिन … Read more

भाजप नेता म्हणतो श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी येते!

पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला … Read more

निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,  असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

रात्री उशिरापर्यंत गाणी वाजवल्याने गुन्हा दाखल

नगर : रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणी वाजवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका मंडळाविरूध्द गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. संजयनगर येथील गणेश मित्र मंडळाच्या गणपती मंडपासमोर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवाना स्पिकर लावून कर्णकर्कश्य आवाजात गाणी लावली. याप्रकरणी कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या फिर्यादीवरून देविदास तुकाराम वैराळ (भूषणनगर, केडगाव) व संदीप अरुण सूर्यवंशी (काटवन खंडोबा) … Read more

कांदा @ २७०० रूपये

राहुरी शहर : बाजार समितीच्या वांबोरी उपकेंद्रावर काल कांद्याची चार हजार ९४४ गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – २१०० ते २७००, कांदा नं. २ – १५०० ते २०७५, कांदा नं. ३ – ५०० ते १४७५, गोल्टी – … Read more

आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध

नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे. आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण … Read more