श्रीरामपूरचा आमदार राधाकृष्ण विखेच ठरविणार!

श्रीरामपूर ;- विखे परिवार व त्यांना मानणाऱ्या संघटनेची ताकद काय आहे, हे आम्ही तीन दिवसात खा. सदाशिव लोखंडे यांना ६५ हजार मतांनी पुन्हा खासदार करून दाखवून दिले. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी श्रीरामपूरचा आमदार कोणाला करायचे, हे विखे ना. राधाकृष्ण विखेच ठरविणार आहेत, असा सूचक इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. निघोज येथील रेशनकार्ड … Read more

पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट !

श्रीरामपूर : आमदार कांबळे यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मातोश्रीवरून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. उमेदवारी लादल्यास पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद … Read more

तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड

बॉलीवूडमध्ये सध्या विविध खेळाडूंच्या जीवनावर आधारीत बायोपीकची क्रेझ आहे. महेंद्रसिंग धोनी, कपिलदेव, सायना नेहवाल यांच्या जीवनावरील बायोपीकसोबतच आता महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूच्याही बायोपीकची चर्चा आहे. यापूर्वी एका खेळाडूची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड केल्याचे बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, … Read more

माधुरी खऱ्या अर्थाने ‘धकधक गर्ल’ वाटत होती!

मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही. तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या … Read more

पैसे मागितल्याने टपरी चालकाचा खून

पुणे : बाणेर परिसरातील पानटपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघांनी कोयता व गुप्तीने वार करून एकाचा खून केला. ही घटना बाणेरमधील डी मार्टजवळ रविवारी (दि.१) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. संतोष नरहरी कदम (वय ३२, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे मृत टपरीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रामप्रभु मोटे (वय ३९, … Read more

या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी,१ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास!

लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे. राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे. याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट … Read more

‘यावेळचा’ व्यायाम वाढवतो स्मरणशक्ती !

मेलबर्न : शाळेत शिकविलेला अभ्यास बऱ्याचदा मुले घरी पोहोचताच विसरून जातात. पण आता ही समस्या फक्त थोड्याशा व्यायामाद्वारे दूर केली जाऊ शकेल. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात असे दिसून आले की, नवीन काहीतरी शिकल्यानंतर थोडाफार व्यायाम केल्यास तो अभ्यास मुलांच्या खासकरून मुलीच्या जास्त काळपर्यंत लक्षात राहण्यास मदत होते. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी २६५ लोकांची निवड … Read more

समुद्री शिंपला कर्करोगाचा धोका कमी करू शकतो

सिडनी : एका समुद्री शिंपल्याच्या प्रजातीमध्ये आढळून येणारा एक घटक कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी असल्याचे एका ताज्या अध्ययनातून समोर आले आहे. या शिंपल्याच्या मोलस्क गं्रथींमध्ये आढळून येणाऱ्या खास प्रकारच्या रसायनावर सुमारे दहा वर्षे सुरू असलेल्या संशोधनानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, समुद्री शिंपल्यातील हा घटक आतड्याच्या कर्करोगापासून बचाव करण्यात प्रभावी आहे. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील … Read more

प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

परळी : प्रेम प्रकरणातून शहरातील एका तेवीस वर्षीय तरुणाचा ब्लेडने गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२) उघडकीस आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनिल बसवेश्वर हालगे (२३, रा. गणेशपार, परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. शहर ठाण्याजवळील कब्रस्तानमध्ये त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सोमवारी … Read more

प्रियकरासोबत पळून जाताना प्रेयसीचा मृत्यू

वर्धा : घरच्या मंडळींचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या एका मुलीला जंगली जनावरांपासून शेतात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाह तारेला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मजरा गावाजवळ घडली. भद्रावती तालुक्यातील निंबाळा येथील हेमंत बाळकृष्ण दडमल (वय २३) याचे वरोरा तालुक्यातील खैरगाव (परसोडा) येथील कोमल गराटे (१९) हिच्यासोबत … Read more

‘कबीर सिंह’ ने आतापर्यंत कमविले ‘इतके’ कोटी…

बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’चा धडाका सुरूच आहे. चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपये एवढा व्यवसाय केला. ‘कबीर सिंह’ची घोडदौड अगदी जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा १६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मधल्या काळात चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तिकडे ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ या हॉलीवूडपटाने पहिल्या दिवशी ३ … Read more

पाकिस्तान भारतासोबत युध्दाच्या तयारीत?

नवी दिल्ली : काश्मीरवर दबाव निर्माण करण्यासाठी पाकिस्तान अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे. कूटनीतीत अपयशी झाल्यानंतर युध्द आणि अणुहल्ल्यांची धमकी देणाऱ्या पाकने आता सैन्यस्तरावर आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानी सेना बालटोरो सेक्टरमध्ये स्कार्डू परिसरात मोर्चांवर बंकर तयार करत आहे. पाकच्या ताब्यातील पीओकेमध्ये येणारा हा परिसर जवळपास कारगीलच्या समोर आहे आणि हा नियंत्रण … Read more

आ.जगताप यांच्याकडून महापालिकेचा निषेध

अहमदनगर : शहरामध्ये गणेशाचे आगमन भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात झाले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील रस्त्याचे पॅचिंग, कचऱ्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात होता, परंतु यावर्षी महापालिका प्रशासनाच्या उदासीनपणामुळे कुठलीही उपाययोजना झाली नसल्यामुळे नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत २ … Read more

श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी!

श्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात … Read more

विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे

शेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला. यापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही … Read more

एकटे राहणारी मुले असतात लट्ठ !

न्यूयॉर्क : लठ्ठपणासाठी बदलती जीवनशैली एक प्रमुख कारण समजले जाते. अमेरिकी शास्त्रज्ञांनंी लठ्ठपणाशी संबंधित एक नवीन दावा केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, जी मुले एकटी राहतात वा वाढत्या वयामध्ये ज्या मुलांच्या शेजारीपाजारी कुणी राहत नाही वा त्यांना शेजाऱ्यांची सोबत मिळत नाही, त्यांच्यामध्ये मोठेपणा अन्य मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाची शक्यता एक-तृतियांशाने जास्त असते. या अध्ययनाचे प्रमुख आणि कार्नेल … Read more

चक्क कॉफीपासून बनविले सनग्लासेस !

लंडन : कॉफी पिण्याच्या कामी येते आणि सनग्लासेस म्हणजे चष्मा उन्हापासून बचाव करण्यासाठी. डोकेदुखी कमी करण्यासाठी दोन्हींची मदत होते. असे असले तरी कॉफी व सनग्लासेस यांच्यात एखादा फार जवळचा संबंध नाही. मात्र लवकरच दोन्हीमध्ये एक नाते तयार होणार आहे. कारण आता कॉफीचा सनग्लासेस बनविण्यासाठी वापर केला जात आहे. युक्रेनमधील ओचिस आयवेयर ब्रँडने एक संशोधन करत … Read more

आधार लिंक केले असेल तरच दारू भेटणार !

नवी दिल्ली : दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल सतत येत असलेल्या तक्रारीनंतर आता उत्पादन शुल्क विभागाने ही समस्या सोडवण्यासाठी अनोेखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार दारूची बाटली खरेदी करण्यापूर्वी आधारकार्ड जोडावे लागणार आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे कुठेही रिकामी बाटली फेकणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करता येईल. कागदावर ही योजना चांगली वाटत असली तरी, त्यामुळे चोरून पिणाऱ्यांची चांगलीच अडचण … Read more