मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही.
तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असणारा अॅप्लिक वर्कवाला लेहंगा घातला होता.
या लूकमध्ये ती खूपच छान दिसत होती. सेलिब्रिटी स्टायलिस्ट दिशा पंजाबीने तिचा हा लूक खुलवला होता. या लेहंग्यावर तिने खड्यांचा बेल्ट लावला होता. बोटांमधल्या अंगठ्याही शोभून दिसत होत्या. तिने मोती आणि खड्यांच्या बांगड्या घातल्या होत्या.
- भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण
- Investment Tips: एसआयपीत गुंतवणूक करून दुपटीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर करा ‘हे’ काम! गुंतवणुकीपेक्षा तिप्पट मिळेल पैसा
- आर २१ लस ठरणार गेम चेंजर
- Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड
- दक्षिण चीनमध्ये महामार्ग वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू