पोलीस व ग्रामस्थ यांच्यात समन्वय आवश्यक – वैभव पिचड

राजूर : पोलीस प्रशासन व ग्रामस्थात समन्वय असल्यास गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील राजूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केला. मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजूर येथील शासकीय विश्रामगृहावर ग्रामस्थ, मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार व शांतता कमिटी यांची बैठक मा. आ. … Read more

मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा खून झाल्याच उघड

श्रीरामपूर : शहरातील सूतगिरणी परिसरात राहणारे रामदास भीमराज कडनोर (वय ३४) यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. पोलीस तपासात त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रामदास कडनोर यांचा मृतदेह दि. १६ ऑगस्ट रोजी वॉर्ड क्र. दोनमध्ये कालव्यात आढळून आला होता. … Read more

नापिकीला कंटाळुन शेतकर्याची गळफास घेवुन आत्महत्या

पारनेर :- गेल्या दोन तीन वर्षापासुन पाचविला पुजनेला दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने पदरी आलेल्या नापिकीला कंटाळुन गारगुंडी( ता. पारनेर) येथील तरूण शेतकरी नितीन प्रकाश झावरे (वय-३८ ) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असुन पारनेर पोलिस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली … Read more

संगमनेर तालुक्यात भूकंपसदृश्य धक्के

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील बोटा माळवाडी परिसरात शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री भूकंपसदृश्य सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही असे धक्के वारंवार बसलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून बोटा परिसरासह आजूबाजूच्या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. तर काही धक्के मोठे बसलेले असल्याने त्या धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी … Read more

भाऊसाहेब कांबळेंचा सेना प्रवेश लांबणार ?

श्रीरामपूर : भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख 5 सप्टेंबर निश्चित झाली असली तरी शिवसेनेमधील अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शहराध्यक्ष सचिन बडदे हे कांबळे यांना मातोश्रीवर घेऊन गेले. हा निर्णय घेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे, खा. सदाशिव लोखंडे … Read more

या हॉटेलमध्ये होणार भाजप इच्छुकांच्या मुलाखती

नगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मंगळवारी होणाऱ्या मुलाखती एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या. या मुलाखती बुधवारी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी दिली. तारकपूर येथील व्ही स्टार हॉटेलमध्ये या मुलाखती होतील. अकोले ११ ते ११.३०, संगमनेर ११ ते १२, कोपरगाव १२ ते १२.३०, शिर्डी १२ ते १ ,श्रीरामपूर १ ते १.३०, नेवासे १.३० … Read more

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या

नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते. पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी … Read more

चकमकीत भाजप खासदाराचे फुटले डोके !

कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या डोक्याला रविवारी जखम झाली. बराकपूरचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी मारहाण केल्यानेच आपल्या डोक्याला मोठी जखम झाली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, श्यामनगर येथील भाजपच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याच्या मुद्द्यावरून … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक – डॉ. मनमोहनसिंग

नवी दिल्ली : स्थिती चिंताजनक असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी केली. सिंग म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पादन केवळ ५% च्या दराने वाढले आहे. यातून मंदीच्या विळख्यात असल्याचा इशारा मिळतो. भारतात वेगवान विकासाची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या चहुबाजूच्या कुव्यवस्थापनामुळे मंदी आली आहे. निर्मिती क्षेत्राचा वृद्धी दर ०.६% आहे. यातून स्पष्ट होते की, अर्थव्यवस्था … Read more

कांबळेंच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवले चक्क चार्टर विमान!

श्रीरामपूर : विराेधी पक्षातील आमदारांना राजीनामा देण्याची जेवढी घाई झाली आहे, तेवढीच सत्ताधारी पक्षांनाही तेे राजीनामा मंजूर करवून घेण्याची घाई झालेली दिसते. श्रीरामपूरमधील काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चक्क विशेष चार्टर विमानाची व्यवस्था केली हाेती. कांबळे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस … Read more

३५ वर्षांच्या अपयशाचा पर्दाफाश कोण करणार ?

संगमनेर: सरकारच्या विरोधात राज्यात पर्दाफाश यात्रा काढली जाते, पण तालुक्यातील ३५ वर्षांच्या अपयशाचा पर्दाफाश कोण करणार? कार्यकर्त्यांनाच आता मतभेद विसरुन ठामपणे उभे रहावे लागेल. देशाचे भवितव्य घडवण्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. या कामाचा संदेश प्रत्येक बूथप्रमुखाने मतदारांपर्यंत पोहोचवला पाहिजे. उद्याची लढाई निर्णायक आहे, असे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण … Read more

भाजपकडून निवडणूक लढवणार नाही – माजी आमदार शंकरराव गडाख

नेवासा : मी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार या चिंतेने पछाडलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाच भाजपची उमेदवारी लखलाभ होवो. मी कधीही भाजपकडून उमेदवारी करणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत व जि. प. सदस्य सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी गडाख रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके … Read more

मराठा व ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला पाठिंबा – रामदास आठवले

राहुरी: आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा व ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आपला पाठिंबा होता. राज्यातील पुन्हा भाजप आघाडीचे सरकार येणार आहे. मात्र, आम्हाला सोबत घेऊन, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कंेद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देवळाली प्रवरा येथे आरपीआय मेळाव्यात केले. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात रिपाइंकडून निवडणूक अनेक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सुरेंद्र थोरात … Read more

श्रीगोंदे मतदारसंघासाठी १८ कोटींंचा निधी

श्रीगोंदे : श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत जल संधारणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यातील काही कामांचा कार्यारंभ आदेश झाला आहे, तर काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली. मतदारसंघातील ११ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ८७ लाख एवढा निधी मंजूर होऊन … Read more

नगर शहरातून भाजपची उमेदवारी करण्यासाठी रस्सीखेच

नगर: शहरातून भाजपची उमेदवारी करण्यासाठी चार जण इच्छुक असल्याचे सांगितले जाते. महापालिका सत्तेतील भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे, नगरचे माजी खासदार दिलीप गांधी, मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असलेले अॅड. अभय आगरकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड या चौघांची नावे चर्चेत आहेत. यंदाच्या लोकसभेच्या तिकिटाच्या शर्यतीत गांधी व बेरड यांची नावे होती. … Read more

भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत आव्हान

अहमदनगर : कर्जत-जामखेडला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, शिर्डीला राधाकृष्ण विखे व अकोल्यात वैभव पिचड या चार जागांवरील उमेदवारांना पक्षांतर्गत आव्हान सध्या तरी दिसत नाही. पण तीन तालुक्यांतून मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. कोपरगावला स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे व कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे तर पाथर्डी-शेवगाव … Read more

कर्जत – जामखेड ‘ मध्ये नगराध्यक्ष राऊत निवडणूक लढविणार ?

कर्जत : प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील समर्थकांचा ९ सप्टेंबरला कर्जतमध्ये संकल्प मेळावा आयोजित केला आहे. त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीची भूमिका जाहीर करणार आहेत. राऊत निवडणुकीत उतरल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राऊत हे मुळचे शिवसैनिक आहेत. काही काळ राष्ट्रवादीतही ते गेले होते. … Read more

राम शिंदे व भाजपचे गुंड जिल्हयात अशांततेचे वातावरण तयार करत आहेत !

कर्जत – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कर्जत दौऱ्यावर येणार असल्याने युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर त्यांचे लक्ष वेधून निषेध करण्याबाबतचे कर्जत पोलिस स्टेशनला निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. दरम्यान निवेदनावर सही केलेल्या राशीन येथील किरण पोटफोडे या कार्यकर्त्याला गावगुंडांनी मारहाण केली. या घटनेचा कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांना अटक न झाल्यास … Read more