Shirdi News : शिर्डीत आणणार मदर डेअरी चा मोठा प्रकल्प !

२१ जानेवारी २०२५ कोपरगाव : “केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष सहकाराचा खरा उद्देश आहे.दूध उत्पादक व सभासद हे खरे दूध संघाचे मालक आहेत.दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील,” असे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. कोपरगाव … Read more

मुंबईकरांनी मागवले ‘एवढे’ कंडोम !

२१ जानेवारी २०२५ मुंबई : सध्याचा जमानाच क्विक कॉमर्सचा आहे. २०२४ वर्षातील आकडेवारी पाहिली तर ते सहज अधोरेखित होते.ब्लिंकइट, झेप्टो,इन्स्टामार्ट यासारख्या सेवांच्या माध्यमातून भारतीयांनी कोणकोणत्या गोष्टी मागवल्या याची आकडेवारीच समोर आली आहे.विशेष म्हणजे भारतीयांनी सर्वाधिक मागवलेल्या गोष्टींची यादी अगदीच थक्क करणारी आहे. आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर मुंबईकरांनी ब्लिंकइटवरून वर्षभरात १७.६ लाख कंडोम मागवले आहेत.बंगळुरूमध्ये झेप्टोवरून … Read more

वेब ब्राऊजरही नाही सेफ ! सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे उभा राहतोय सेफ्टी चा प्रश्न..

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : इंटरनेट, डिजिटल पद्धतींचा वापर वाढतोय,तसे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.आपले कोणतेच ऑनलाइन व्यवहार सुरक्षित नाहीत का,असा प्रश्न कधी कधी पडतो.आता हेच पहा ना, नुकतेच गुगलचे ब्राऊजर क्रोम हॅक झाल्याच्या वृत्ताने जगभर खळबळ उडाली होती.गुगल क्रोमचे एक्स्टेन्शनच हॅक झाल्याने वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरीला जाऊ शकतो तसेच दोनदा व्यवहार प्रमाणित … Read more

‘इस्ट्रोजेन’मुळे महिलांना लागते दारूचे व्यसन

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : उंदरांवर केलेल्या वैद्यकीय पूर्व अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने महिलांना दारूचे व्यसन लागू शकते.लैंगिक संप्रेरक (सेक्स हार्मोन) इस्ट्रोजेन महिलांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवते,असे न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल वैद्यकीय संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे. ‘नेचर’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनातून दिसून आले … Read more

ब्रिटिशांनी लुटले ५६ लाख अब्ज ; भारतातून लुटलेली निम्मी संपत्ती १० टक्के श्रीमंतांच्या तिजोरीत !

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : ब्रिटिशांनी १७६५ ते १९०० या कालावधीत भारतातून ६४ हजार ८२० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५६ लाख अब्ज रुपयांची संपत्ती लुटली.यापैकी निम्मी संपत्ती म्हणजे सुमारे ३३,८०० अब्ज डॉलर्सची (२८ लाख अब्ज रुपये) संपत्ती ब्रिटनमधील १० टक्के श्रीमंतांकडे गेल्याची धक्कादायक माहिती ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. ही संपत्ती किती … Read more

ह्युंदाईकडून क्रेटा इलेक्ट्रिकचे अनावरण

२१ जानेवारी २०२५ मुंबई : युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये बहुप्रतीक्षित ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकचे अनावरण केले.ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये तिचे बोल्ड डिझाइन, अद्ययावत तंत्रज्ञान, अद्वितीय परफॉर्मन्स आणि संपूर्ण सुरक्षेसह इलेक्ट्रिक एसयूव्ही क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवला आहे. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या अनावरणाच्या निमित्ताने एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक अन्सू किम म्हणाले की, … Read more

विजेच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली ! वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

२१ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर महावितरणकडून विजेचे भारनियमन सुरू आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.सध्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा, मका, हरभरा, भाजीपाला व ऊस लागवडीसह चारा पिकाची लागवड केलेली आहे. मात्र शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही.त्यामुळे विहिरीत पाणी उपलब्ध असताना पिकांना पाणी कसे द्यायचे,याची चिंता … Read more

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

२१ जानेवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील ठाकरवाडी येथील विवाहित तरुण दत्तू जाधव याने रात्रीच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतल्याची घटना काल दि. २० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की दत्तू महादू जाधव (वय ३८ वर्षे, रा. म्हैसगाव, ठाकरवाडी, ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव … Read more

घरकूल मंजूर करताना पैसे घेतले तर तत्काळ कारवाई करू ! जयकुमार गोरे : ग्रामविकास विभागाची पहिली विभागीय आढावा बैठक पुण्यात

२१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन काम करून घेणार आहे.अंमलबजावणी करताना पंचायतस्तरावर भ्रष्टाचार होत आहे, याबाबतच्या तक्रारी येत आहेत. जो अधिकारी घरकुलात पैसे घेईल किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले, तर त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याचा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यात दिला. तसेच नागरिकांना तक्रारीसाठी स्वतः माझा मोबाईल नंबर, … Read more

२६ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – अजितदादा

२१ जानेवारी २०२५ जालना : महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती.या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या किंवा गरजू महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा झाला आहे. निवडणूक काळात हि योजना सुरु झाल्यामुळे या योजनेवर संशय व्यक्त केला जात होता. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची आवई विरोधकांनी निवडणुकीच्या काळात उठवली होती,परंतु तसे काही … Read more

राज्य निवडणूक आयोगाला मिळाले १३५ दिवसांनंतर निवडणूक आयुक्त !

२१ जानेवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने तब्बल १३५ दिवसांनंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमले आहेत.माजी सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी वाघमारे यांच्या नावाने अधिसूचना जारी केली आहे. महायुती सरकारचे मंत्री आपल्या पहिल्या शंभर दिवसांतील कामांचे नियोजन करण्यात गर्क आहेत, तर सरकारमधील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या … Read more

बँक भरती परीक्षेत कॉपी ; इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करणारा उमेदवार अटकेत !

२१ जानेवारी २०२५ नवी मुंबई : रायगड डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑप.बँकेतील भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस व स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. आकाश भाऊसिंग घुनावत (२८) असे या उमेदवाराचे नाव असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेट बीची प्रश्नपत्रिका स्पाय … Read more

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावरून महाविकास आघाडीत असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी दीड तास चर्चा झाली.राजकीय वर्तुळात त्यामुळे उलटसुलट चर्चाना ऊत आला आहे.दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते, युवा … Read more

शेअर बाजारात तेजी कायम ! सेन्सेक्स ४५४ अंकांनी वाढला निफ्टी २३,३०० अंकाच्या पार

२१ जानेवारी २०२५ मुंबई : स्थानिक शेअर बाजारात सोमवारी तेजी कायम राहिली आणि सेन्सेक्स ४५४ अंकांनी वधारला,तर निफ्टी २३,३०० अंकाच्या वर बंद झाला.जागतिक स्तरावर मजबूत ट्रेंड दरम्यान बँक समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार प्रामुख्याने आघाडीवर होता.३० समभागांवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स ४५४.११ अंकांनी उसळी घेत ७७,०७३.४४ अंकावर बंद झाला.व्यापारादरम्यान तो ६९९.६१ अंकांवर चढला होता.निफ्टीही १४१.५५ अंकांनी वाढून … Read more

जळगावात सैराट ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तीन वर्षांनंतर घेतला जावयाचा बदला

२१ जानेवारी २०२५ जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू होता.तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (२६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर धारदार कोयता व चॉपरने वार केले.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले.ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात … Read more

मानहानीप्रकरणी राहुल गांधींना तूर्तास दिलासा

२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे.न्यायालयाने या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याप्रकरणी झारखंड सरकार व मानहानीचे प्रकरण दाखल करणारे … Read more

अबुधाबी सर्वात सुरक्षित शहर,यादीत महाराष्ट्रातील ३ शहरे ! ३८२ शहरांच्या जागतिक क्रमवारीत १९ भारतीय शहरांना स्थान

२१ जानेवारी २०२५ : अबुधाबी: संयुक्त अरब अमिरात (यूएई) मधील अबुधाबी हे सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. टॉप पाचमध्ये यूएईतील चार शहरांचा समावेश आहे.३८२ शहरांच्या क्रमवारीत १९ भारतीय शहरे असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे आणि मुंबईचा समावेश आहे.तर दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिझवर्ग हे सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे. ऑनलाइन डेटाबेस ‘नंबीओ’कडून … Read more

Jio Finance Share Price : मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे शेअर घ्या आणि श्रीमंत व्हा !

Jio Finance

Jio Finance Share : सोमवार, 20 जानेवारी 2025, रोजी शेअर बाजारात घडलेल्या घसरणीच्या दरम्यान, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या एनबीएफसी कंपनीच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे संकेत दिले गेले. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या किंमतीवर जिओ फायनान्शियल शेअरमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध आहे. टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस जाहीर करत तज्ज्ञांनी या शेअरवर दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. … Read more