file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रिकल कंपनीत चारचाकी वाहनातून आलेल्या ६ ते ७ दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला मारहाण करुन दहशत निर्माण केली.

नंतर १७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या. हा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.

एमआयडीसीत एल २६ मध्ये झेन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. शुक्रवारी पहाटे दरोडेखोर चारचाकी वाहनात बसून आले.

त्यांनी सुरक्षरक्षकला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

कंपनीत लावलेल्या १७ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करुन कंपनीचे चारही शटरचे लॉक लोखंडी टॉमीने तोडले.

व १७ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या कॉपरच्या पट्टया चोरुन नेल्या.