अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-   युरोप आणि अमेरिकेत अनेक राज्यांतील कोरोना रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.(Omicron)

ख्रिसमस सेलिब्रिशेनच्या निमित्ताने जगभरातील अनेक पर्यटक प्रवासाला निघाले असतानाच ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने आता प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने कहर केला आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सतत वाढत आहे.

त्यामुळे अनेक देशांनी आता पुन्हा कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. प्रवासाच्या दृष्टीने डिसेंबर महिना हा वर्षातील सर्वात व्यस्त काळ असतो.

ख्रिसमस, न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी देशातील अनेक नागरिक परदेशात जात असतात. मात्र यंदा या सेलिब्रेशनवरही कोरोनाचे संकट कायम आहे.

येत्या शुक्रवारपासून जगभरातील सुमारे ११,५०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर हजारो उड्डाणे उशीराने सुरु आहेत.