सातारा : सध्या राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि मशिदीवरील भोंगे या दोन मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करत आहेत. याच टीकांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले, सातारा (Satara) जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.या जिल्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार आहे. प्रत्येक गावाचं सहकार्य असल्या शिवाय कोणतेही विकास होऊ शकत नाहीत.

स्वच्छते बाबत सातारा जिल्हा कायम पहिला राहिला. राज्याला दिशा देण्याचे काम साताऱ्याने केले. राज्यात ऊसाची खुप परिस्थिती वाईट आहे. साखर कारखाना चालवण्याचे वेड्या गबाळ्याचे काम नाही.

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. किसनवीर कारखान्यात 52 हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेणार आहे असे अजित पवार साताऱ्यामध्ये बोलताना म्हणाले आहेत.

जे पोपटा सारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा देखील साधला आहे.

ते म्हणाले, साखर कारखान्यामध्ये चुकीचे बोर्ड निवडून आले तर नागरिकांच्या प्रपंचाला फटका बसतो. राज्यात काही लोक जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत त्याला सातारकरांनी बळी पडू नका. असा टोलाही त्यांनी लगावला,

तसेच लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात. कधी टोल बंद करा म्हणतात. तर कधी युपी बिहारच्या लोकांना हाकलून द्या, भोंगे बंद करा असे म्हणतात. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला दिसला नाही का?

यांना परंतु यांच्या या निर्णयामुळे तुम्ही कोणाला तरी अडचणीत आण्याचा प्रयत्न करताय. परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे. समंजस भूमिका घेवून मार्ग काढू शकतो असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर आणि राणा दाम्पत्यालाही टोला लगावला आहे. ते म्हणाले, हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर जावून बोलायचीये. परंतु तुम्हाला म्हणायचीये तर घरी जावून म्हणा, असा टोलाही त्यानी राणा यांना लगावाल आहे.

तसेच महाराष्ट्राचं वातावरण जर बिघडलं तर कोणताही उद्योगपती महाराष्ट्रात येणार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव त्यावर कोण बोलत नाही. बारामतीला एक जण उभा राहिला होता. पण बारामतीने योग्य जागा दाखवली. असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे.

राज्यात कोणीही वातावरण खराब करु नये. सातारा जिल्हयात पर्यटनासाठी 50 कोटींचा खर्च करुन तापोळा बामणोलीचे रुपडं पालटणार आहे. महाबळेश्वर मध्ये विकास कामांसाठी 100 कोटीची तरतूद करणार असेही पवारांनी सांगितले आहे.