Maharashtra : राज्यात महिलांबाबत दिवसेंदिवस वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता योगगुरू रामदेव बाबा यांनीही महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांबाबत धक्कादायक विधान केले आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरल्याचे दिसत आहे. महिलांनी काही घातले नाही तरीही त्या चांगल्याच दिसतात असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

रामदेव बाबा यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात… माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात. असे विधान केल्याने रामदेव बाबा टीकाकरांच्या नजरेत आले आहेत.

काय म्हणाले रामदेव बाबा साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही… आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात.. आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे वादग्रस्त विधान केले आहे.

ठाण्यातील एका महासंमेलनात रामदेव बाबा बोलत होते. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांची देखील खूप स्तुती केल्याचे दिसत आहे. ते म्हणाले, अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची एवढी लगन आहे की मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत.

कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. खुश राहतात, जेव्हा बघावं लहान मुलांसारखे हसत असतात. जसे स्मित हास्य अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच स्मित हास्य मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायचं आहे असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.