Personal Loan:  अनेक वेळा लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. मात्र, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कधी काही त्यांच्याकडे पुरेसा पैसे नसतात. अशा वेळी लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी बँकेच्यामार्फत वैयक्तिक कर्ज घेतात आणि आपली गरज पूर्ण करतात.

ही प्रक्रिया पूर्ण करताना बँकांना आवश्यक कागदपत्रे देखील द्यावे लागतात.  मात्र, ज्याला कर्ज हवे आहे त्याच्याकडे पॅनकार्ड आणि सॅलरी स्लिपही नसल्याची परिस्थिती अनेकवेळा पाहण्यात आली आहे. तथापि, पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिप नसतानाही लोकांना वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

pan card

पॅन (Permanent Account Number) कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे ज्यामध्ये करदात्याची आर्थिक माहिती असते. शिवाय, वैयक्तिक कर्जासाठी पूर्णपणे डिजिटल अर्जाच्या बाबतीत, ओळख आणि आर्थिक विश्वासार्हता व्हेरिफाय करण्यासाठी आणि राष्ट्रीयत्व तसेच कर माहितीचे प्रमाणीकरण करण्यासाठी पॅन आणि आधार हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक कर्ज पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवाय देखील उपलब्ध आहे.

credit score

CIBIL स्कोअर 700 आणि त्याहून अधिक असल्याने, कर्ज देणारी कंपनी कागदपत्रांशिवाय वैयक्तिक कर्ज देण्यास मागेपुढे पाहत नाही. उच्च क्रेडिट स्कोअरमुळे आर्थिक विश्वासार्हता वाढते.

previous record

जर तुम्ही पूर्वी कर्ज घेतले असेल आणि तुम्ही ते वेळेवर भरले असेल तर ते तुमचे स्पष्ट रेकॉर्ड दर्शवते. बँका किंवा वित्तसंबंधित कंपन्या मागील रेकॉर्ड पाहूनही पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवाय वैयक्तिक कर्ज देतात.

Collateral Security

जर तुम्ही कोणतीही कागदपत्रे सादर करू शकत नसाल तर तुम्ही तुमची कोणतीही मालमत्ता सुरक्षा म्हणून जमा करू शकता आणि वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

हे पण वाचा :- Oppo Fantastic Days सेलमध्ये बंपर डिस्काउंट ! ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळत आहे भन्नाट ऑफर; पहा संपूर्ण लिस्ट