अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे बाजरपेठा देखील ग्राहकांच्या गर्दीसाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र जिल्ह्यात फटका बंदीचा निर्णय असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सुरु होता.

मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यानी हा निर्णय जाहीर केला आहे.

त्यामुळे फटाका व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नगरसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती .

यातच नगर जिल्ह्यात देखील फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते.त्यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं.दिवाळीत होणारं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी आणण्याचे आदेश, आयुक्त गमे यांनी दिले होते.

पण आता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर आता उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे.