PM Narendra Modi Contact : अनेकांना त्यांच्या समस्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे थेट तक्रार (Complaint) करण्याची इच्छा असते. परंतु, तक्रार कुठे आणि कशी करावी हेच त्यांना माहीत नसते.

देशातील नागरिकांना आता त्यांची समस्या सहज नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहोचवणे शक्य झाले आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

तुम्ही तुमचा संदेश याप्रमाणे पोहोचवू शकता:-

क्रमांक 1

तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत (PM) पोचवण्यासाठी तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) म्हणजेच PMO शी त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://www.pmindia.gov.in/en/ ला भेट देऊ शकता.

क्रमांक 2

तुम्हाला तुमचा संदेश देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही यासाठी नमो ॲपची (Namo app) मदत घेऊ शकता. या ॲपद्वारे तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून (Play Store) डाउनलोड करू शकता.

क्रमांक 3

सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातूनही तुम्ही तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता. फेसबुक अकाउंट https://www.facebook.com/narendramodi, Twitter अकाउंट https://twitter.com/narendramodi आणि Instagram अकाउंटhttps://www.instagram.com/narendramodi/?hl=en द्वारे देखील पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकता.

क्रमांक 4

तुम्हाला तुमचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी 91-11-23019545, 23016857 या फॅक्सद्वारे संपर्क साधू शकता.

तुम्ही पीएमओच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या पत्त्यावर पत्र लिहू शकता “नरेंद्र मोदी वेब इन्फॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल, नवी दिल्ली – 110011”
याशिवाय तुम्ही connect@mygov.nic.in वर ईमेल देखील करू शकता.