अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- भर वस्तीमध्ये असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तीन ते चार चोरट्यांनी फोडले असल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ गावात घडली आहे.

याबाबत विश्वास पोपट कसबे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरटे मशीन घेऊन जात असताना

गस्तीवर असणंऱ्या पोलीस वाहनाचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यातच टाकून पोबारा केला. या मशीनमध्ये अंदाजे पंचवीस लाख रुपयापेक्षा अधिक रोकड असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशियतास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळावर पोलिस उपअधीक्षक आण्णा जाधव, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली,.