file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील पाच ठिकाणी दारू अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा आरोपीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईअंतर्गत पोलिसांनी एक लाख 70 हजार 900 रूपयांची देशी, विदेशी, ताडी, गावठी हातभट्टी दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे…

संतोष मधुकर साळवे (वय 42 रा. ढवळपुरी)

अनिल सतिराम विधाटे (वय 21)

दत्तात्रय तिकोले (दोघे रा. वणकुटे)

पंडा रामभाऊ खंडवे (वय 30)

नितीन मारूती साळवे (वय 45 दोघे रा. पळसी)

संभाजी विठ्ठल गव्हाणे (रा. म्हसे)

या सहा आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत.