file photo

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास करतांना पोलिसांनी अवघ्या 72 तासात चोरट्यांचा तपास लावण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी ३ आरोपींना तात्काळ अटक केली तर एक जण फरार होता. कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव

यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांची पथके तयार करून ठिकठिकाणी सापळे लावले. ३ दिवसांच्या आतच चोरट्यांचा तपास लावला.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे २३ मोबाईल हस्तगत केले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर हे सर्व मोबाईल संबंधित दुकानचालकास परत करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.