Maharashtra news : ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाइट अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. ‘भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामबद्दल अडचणी करून वाद निर्माण करत आहात.

तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही,’ असा मजकूर हॅकर्सने या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.

वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.सुरवातीला ही साइट कोणी व कशासाठी हॅक केली हे कळाले नव्हते. त्यांनतर त्यावर वरील मजकूर दिसून आल्याने सायबर हल्लेखोरांचा उद्देश लक्षात आला आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्तया नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कारण यामागे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. वेबसाईट रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे