अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्वीटकरुन ही माहिती दिली आहे. रावसाहेब दानवे यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली.

त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रावसाहेब दानवे हे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. कार्यकर्त्यांनी यांची नोंद घ्यावी, असं अवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसंच, संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असंही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात करोना प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्गही फैलावत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

आता हा विळखा अधिक घट्ट होत चालला असून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १० ते १५ मंत्री आणि ७० आमदारांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, युवा सेनेचे नेते वरूण देसाई, आमदार प्रताप सरनाईक, रोहित पवार, भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच इतर आमदारांनाही करोनाची बाधा झाली आहे.