Ahmednagar News : १९७२ पासून शहरात राजकारण करतना कुठेही कटुता येणार नाही याची काळजी घेतली. सर्वांना बरोबर घेत सर्व पक्षांशी चांगले संबध जपले. राजकारणापेक्षा मैत्री जपली. मात्र काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक व पाप मी केले आहे.
त्यामुळे आपले नगर शहर बदनाम व मागे गेले आहे. शहरात व्यापार व औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत आहे, अशी खंत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केली.
शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी दादाभाऊ कळमकरांनी खंत व्यक्त करत पुढील काळात नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले.
वसंत लोढा म्हणाले ते खरं आहे. आता पुन्हा ती चूक करणार नाही. ही चूक सुधारण्याची संधी आलेली आहे. शहरात निर्माण झालेली बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्व एक होवू. वर काहीही निर्णय होवो पक्षिय मतभेद बाजूला ठेवू.
याला माझी तयारी आहे. शहराचा आमदार व महानगरपालिकेचे सत्ताधारी एकाच विचाराचे असावेत तरच शहराचा विकास होईल, अशी सूचनाही दादा कळमकर यांनी केली.
कळमकर पुढे म्हणाले, मी व अनिल राठोड ५ वेळा विधानसभा विरोधात लढलो. पण निवडणुका संपल्यावर मतभेत विसरून कायम एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत. नगरपालिकेच्या माध्यमातूनही शहराच्या विकासासठी अनेकदा भाजपला बरोबर घेतले.
पुलोद मधून आमदारकी लढताना भाजपने मोठी साथ दिली म्हणूनच निवडून आलो. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे आनंद झाला असल्याचेही ते म्हणाले.