Abhijeet Bichukle : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या निकालाचा कल सध्या हाती येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळत आहे. यामुळे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
असे असताना या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झालेले उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत. कसब्यात सहाव्या फेरीत धंगेकर साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर चिंचवडमध्ये जगताप यांनी पाचव्या फेरी अखेर अडीच हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
यामुळे अभिजीत बिचुकले आता या निवडणुकीत देखील पराभूत होणार की काही जादू दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे.
कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी जगताप पुढे आहेत. चिंचवडमध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. धंगेकरांनी तीन हजारी आघाडी घेतली आहे. रासनेंनी २ हजार ८०० मते हे पहिल्या फेरीत मिळाली आहे.
अश्विनी जगताप यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली आहे. चिंचवडमध्ये पोस्टल मतदानात ४०५३ मते मिळाली आहे. तर राहुल कलाटे १२७३, नाना काटे यांना ३ हजार ६०५ मते मिळाली आहेत. यामध्ये अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.