Bacchu kadu : काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. अनेक ठिकाणी मतदार संघात देखील लोकांना ते पटले नाही. यामुळे गद्दार हा शब्दच आता सर्वांना परिचित झाला आहे. आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडले होते.
आमदार बच्चू कडू यांना देखील याचा सामना करावा लागला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका 80 वर्षाच्या शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवून तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली, असा प्रश्न उपस्थित केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
यामुळे बच्चू कडू यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. आजोबांनी कडू यांनी अपेक्षाभंग केल्याची खंतही व्यक्त केली. घोगरे या ज्येष्ठ शेतकऱ्याने त्यांचा ताफा अडविला. यावेळी बच्चू कडू हे गाडीतून बाहेर आले.
असे असताना आता बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, होय आम्ही गद्दारी केली. नेत्याशी, पक्षाशी केली. मात्र जनतेसाठीच ही गद्दारी केली. ते शेतकरी आमच्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत २-३ मिनिटं चर्चा केली. परंतु त्यांची मानसिकता चर्चा करायची नव्हती.
ते कुणीतरी पाठवून दिलेल्यापैकी असावेत, असं चित्र होतं. पण एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उद्धव शाहेबांना सोडून का गेले. काही लोकं म्हणतात, आम्ही गद्दारी केली. होय. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही नेत्यासोबत, पक्षासोबत गद्दारी केली तर होय. पण जनतेसोबत गद्दारी करणार नाही, असेही ते म्हणाले.
मी शिवसेनेत असताना आमच्यावर जेव्हा अन्याय झाला. त्यावेळी इथले पालकमंत्री भाजपाचे होते. आम्ही शिवसेनेचे होते. आमच्यावर केसेस झाल्या. तेव्हा शिवसेनेकडून न्याय मिळाला नाही, असेही ते म्हणाले.