नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांना शहर भाजपाचे समर्थन ; आ. जगताप म्हणतात भाजपा…..

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

खरे तर महाराष्ट्रातील प्रमुख दोन पक्ष फुटल्यानंतर म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

यामुळे या निवडणुका विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक देखील लक्षवेधीच आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे.

त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना समर्थन दिले आहे. ही बैठक आमदार जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली होती.

या बैठकीला भाजपाचे शहर अध्यक्ष एडवोकेट अभय आगरकर, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, विधानसभा निवडणूक प्रमुख व महायुतीचे समन्वयक महेंद्र गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस महेश नामदे, प्रदेश सदस्या सुरेखा विद्ये, महिला आघाडी प्रमुख प्रिया जानवे, सविता कोटा, पंडित वाघमारे, बाळासाहेब भुजबळ, मयूर बोचूघोळ आदी लोक उपस्थित होते.

यावेळी अभय आगरकर यांनी, भाजपची काही ध्येयधोरणे आहेत. त्यानुसारच काम करून निर्णय घेण्यात येतात. आजपासून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहर भाजपचे अधिकृतरित्या समर्थन देण्यात येत आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत निःस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे काम करून जगताप यांच्यामागे उभे रहावे. त्यांच्या विजयासाठी योगदान द्यावे. महायुतीमधील घटक पक्षांना बरोबर घेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता जास्तीत जास्त प्रचार व काम करू, असे म्हणतं आमदार जगताप यांना समर्थन दिले आहे.

अर्थातच, या निवडणुकीत महायुतीचे सर्व घटक पक्ष जगताप यांच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहेत. यामुळे जगताप यांच्या विजयाची शक्यता अधिक बनली आहे. यावेळी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी, भारतीय जनता पार्टीने मला समर्थन देण्याचे जाहीर केल्याबद्दल आभार व्यक्त करतो.

राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. जिल्ह्यातही सर्वात जास्त महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, यात शंका नाही. भाजप हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ आहे. या निवडणुकीत भाजपने मोठ्या भावाप्रमाणे मदत करावी, असे आवाहन सुद्धा केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe