विधानसभा निवडणूक : अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला उमेदवारांकडे किती संपत्ती आहे ? शिक्षण किती ? पहा…

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यावेळी २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान यंदाच्या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक प्रमुख पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात एकूण सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण या सहा मातब्बर महिला उमेदवारांकडे किती सोने आणि चांदी आहे तसेच या महिला उमेदवारांचे शिक्षण नेमके किती झाले आहे याबाबत आढावा घेणार आहोत.

1) प्रतिभा पाचपुते भारतीय जनता पक्ष : भारतीय जनता पक्षाने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रतिभा पाचपुते यांनी एम एस सी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांच्याकडे चारशे दहा ग्रॅम सोने आहे. तसेच 46 लाख 94 हजार 87 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच एक कोटी 42 लाख 18 हजार 592 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

2) प्रभावती घोगरे काँग्रेस : शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना उमेदवारी मिळाली आहे. घोगरे यांनी आपल्या शपथपत्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे दोन वाहने आहेत. त्यांच्याकडे 285 gm सोने आहे. घोगरे यांच्याकडे 52 लाख दहा हजार 120 रुपयाची जंगम मालमत्ता असून तीन कोटी 50 लाख 11 हजार 300 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. घोगरे यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

3) मोनिका राजळे भाजप : भारतीय जनता पक्षाच्या आ. मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा शेवगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून त्यांच्या नावावर एक चार चाकी वाहन आहे. त्यांच्याकडे 742g सोने असून 2473 ग्रॅम चांदी आहे. दोन कोटी 85 लाख 7200 रुपयाची त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता असून दोन कोटी 50 लाख 84 हजार 718 रुपयांची जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर आहे.

4) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राणी लंके : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राणी लंके यांना पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राणी लंके यांनी एसएससी पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे अजून कोणतेच वाहन नाहीये. त्यांच्याकडे फक्त 30 g म्हणजेच तीन तोळा सोने आहे आणि दोन लाख 93 हजार 221 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पण त्यांच्याकडे कोणतीच स्थावर मालमत्ता नाहीये.

5) अनुराधा नागवडे ठाकरे गट : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अनुराधा नागवडे यांना उमेदवारी बहाल केली आहे. अनुराधा नागवडे यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे दोन वाहन आहेत. नागवडे यांच्याकडे 500 ग्रॅम म्हणजेच 50 तोळे सोने आहे. तसेच 300 ग्रॅम चांदी आहे. नागवडे यांच्याकडे नऊ कोटी 88 लाख 95 हजार 128 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच एक कोटी 25 लाख 48 हजार 320 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

6) हर्षदा काकडे : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून हर्षदा काकडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. हर्षदा काकडे यांनी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यांच्याकडे वाहन नाहीये. काकडे यांच्याकडे 1658.70g एवढे सोने आहे. तसेच 4450 ग्रॅम चांदी आहे. काकडे यांच्याकडे दोन कोटी ५३ लाख दहा हजार चौतीस रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि एक कोटी एकोणावीस लाख 11 हजार ८२६ रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe