आ. संग्राम भैय्या जगताप यांच्या विकास कामांची जनतेला भुरळ ! जगताप यांच्या विकास यात्रेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

दरम्यान आमदार जगताप यांनी मतदारसंघात विकास यात्रेचे आयोजन केले आहे. ही नगर विकासयात्रा रोज एका परिसरात जाते. तिथे विद्यमान आमदार नागरिकांशी संवाद साधतात.

महत्त्वाचे म्हणजे या विकास यात्रेला मतदारसंघातील नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय. पुरुष असो की महिला सारेजण या विकास यात्रेत सहभागी होत आमदार जगताप यांना आशीर्वाद देत आहेत.

यामुळे मतदार संघात जगताप यांच्या या विकास यात्रेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ह्या विकासयात्रेदरम्यान सातत्यानं एक गोष्ट पाहायला आणि ऐकायला मिळत आहे अन ती म्हणजे नगरमध्ये जोरदार विकासकामं होत आहेत अन येथील नागरिक खूश आहेत.

विद्यमान आमदार जगताप यांनी विकासरथाची ही गती कायम ठेवण्याचा निश्चय देखील बोलून दाखवला आहे. किंबहुना विकास रथाची ही गती कायम ठेवण्यासाठी निर्धारच केला आहे.

काल, अर्थातच 3 नोव्हेंबरला चाणक्य चौकातून नगर विकासयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेचे चाणक्य चौक, आसपासचा परिसर, सोसायट्या, बुरूडगाव रस्ता ह्या सर्व ठिकाणी नागरिकांनी मोठ्या आपुलकीने स्वागत केलं. या यात्रेत नागरिक मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवत आहेत.

या यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांकडून शहरात सध्या चालू असलेल्या विविध कामांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. ह्या विकासयात्रेचे वारकरी होण्यात आपल्याला आनंद होत आहे अशी भावना आमदार जगताप यांनी बोलून दाखवली.

यावेळी आमदार जगताप यांनी या यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी महिलांनी, बहिणींनी औक्षण केलं. भाऊबीज असल्याने ह्या औक्षणामध्ये अधिकच माया-ममता होती. मावशी, आजी ह्यांच्या पाया पडून दर्शन घेतलं. त्यांनी डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत भरभरून आशीर्वाद दिला.

यामुळे मला खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. ह्या विकासयात्रेत माजी महापौर गणेश भोसले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या विकास यात्रेच्या निमित्ताने जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

यामुळे आता प्रचारातील ही आघाडी विजय मिळवून देणार का? 23 नोव्हेंबरला नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका काय लागणार याकडे विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe