नगर शहर विधानसभा मतदारसंघ : आ. संग्राम जगताप यांची राजकीय ताकत वाढली, दिवंगत दिलीप गांधी यांचे कुटुंबीय जगतापांना साथ देणार !

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कंबर कसली आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान महायुतीचे उमेदवार आ. संग्राम भैया जगताप यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी स्व. खा. दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची आज 3 नोव्हेंबर 2024 ला त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली अन यावेळी त्यांचे आशीर्वाद घेतलेत.

दरम्यान यावेळी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नीस रोजी गांधींनी या निवडणुकीत आपण आ. जगतापांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असे सांगितले. जगताप यांच्या प्रचारासह सर्वच प्रक्रियेत गांधी कुटुंबीय सक्रिय सहभाग नोंदविणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान गांधी कुटुंबीयांच्या या भूमिकेमुळे आता संग्राम जगताप यांची ताकद प्रचंड वाढणार आहे. गांधी कुटुंबीयांच्या या भूमिकेचा आमदार जगताप यांना निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे.

खरंतर गांधी कुटुंबियांची नगर शहर मतदार संघात मोठी ताकद आहे. गांधी कुटुंबीयांना मानणारा एक मोठा गट आहे. यामुळे दिवंगत खासदार गांधी यांचे कुटुंब जर प्रचारात सहभागी झालेत तर यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा गड शाबूत राखणे जगताप यांना आणखी सोपे होणार आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात गांधी आणि जगताप हे दोन्ही कुटुंब एकत्र आले आहेत. यामुळे ही गोष्ट महायुतीच्या उमेदवारासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी सरोज गांधी यांनी संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे.

त्यांनी मागील दहा वर्षांत नगर शहराचा मोठा विकास केला आहे. आम्ही सर्व गांधी परिवार त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत संग्राम जगताप हेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया दिलीय.

गांधी कुटुंबाच्या या भूमिकेमुळे नक्कीच जगतापांना फायदा होणार आहे असून प्रचारात त्यांची आघाडी पाहायला मिळत आहे. तथापि 23 नोव्हेंबरला नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा गड कोण काबीज करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe