Ahilyanagar Politics News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये सरळ टक्कर होत आहे. येथील मुख्य लढत ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांच्या उमेदवारांमध्येच आहे.
सध्या दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे या प्रचाराच्या रणधुमाळीत मिसेस जगताप देखील सक्रिय झाल्या आहेत. विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका शितल जगताप यांनी देखील प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे.
सौ. जगताप या मतदारसंघातील विविध वसाहतींमध्ये भेट देत प्रचार करतांना दिसत आहेत. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो.
यानुसार, आमदार जगताप यांच्या यशासाठी मिसेस जगताप सुद्धा आता मतदार संघातील नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये जाऊन जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
शहर व उपनगरमधील विविध वसाहतींमध्ये महिलांच्या गाठीभेटी घेत त्यांनी आमदार जगताप यांच्यासाठी चांगलीच वातावरण निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. मिसेस जगताप आ. संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकांची सविस्तर माहिती, तसेच राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचवत आहेत.
मतदार संघात विविध ठिकाणी त्या बैठका घेत आहेत, अन त्यांच्या या बैठकांना महिलावर्गाकडून सर्वात जास्त प्रतिसाद मिळतोय. सौ. जगताप यांनी, आमदार जगतापांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेला दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महिलांना केंद्रस्थानी ठेवत भरपूर योजना सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत आणि या योजना महिलांना आधार देणाऱ्या आहेत.
नगरमध्ये आ.संग्राम जगताप यांच्या माध्यामतून या सर्व योजनांचा लाभ शहरातील महिलांना उपलब्ध करून दिला जात आहे. नगर शहराच्या सर्वांगीण विकासाठी आ. संग्राम जगताप हे कायमचं प्रयत्नशील राहिले आहेत. म्हणून त्यांना मोठे यश आले आहे.
आज नगर शहरातील सर्वच भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास कामे झाली आहेत. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व समस्याही सुटल्याने आ.संग्राम जगताप यांचे शहरातील नागरिकांशी जवळचे ऋणानुबंध जुळले आहेत.
मतदार संघातील नागरिकांसमवेत आमदार जगताप यांचे अतुट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असे सौ शितल जगताप यांनी यावेळी नमूद केले.