Ahmednagar Breaking : ‘मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात’, राजकारणात खळबळ

Pragati
Published:
MLA Rohit PAwar

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांची तयारी सुरु झालीये. आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

दरम्यान आता एका दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात असल्याचा हा दावा केलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवारांबाबत काय केलाय दावा?
मंत्रिपद मिळवण्यासाठी रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते अजित पवारांच्या बाजुला दिसतील असाही दावा त्यांनी केलाय.

त्यामुळे आता पुन्हा एखादा राजकीय भूकंप होणार का? याकडे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी जो दावा केलाय त्यात किती तथ्य आहे? रोहित पवार यावर काही बोलणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा
आ. नितेश राणेंनी या आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटावर देखील टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता उमगलीच नाही. उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्धप्रवृत्तीला येथील जनतेने विरोध दर्शवलाय. तसेच लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल्याने राऊत यांना मिरच्या झोबल्या असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

आ. संग्राम जगतापांचेही नाव शर्यतीत
मंत्रिमंडळ विस्तारात विस्तारात सध्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचेही नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभेच्या अनुशंघाने आ. संग्राम जगताप यांना मंत्रिपद देऊन उपमुख्यंमत्री अजित पवार हे अजित पवार गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न व खा. लंके यांना शह देतील अशी चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe