Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात भाजपाने खासदार, केंद्रीय मंत्री, महापौर, उपमहापौर अशा सर्व पदावर काम केले आहे. मात्र शहराचा आमदार भाजपचा झालेला नाही, ही सल कायम अद्यापही मनात आहे. आता पक्ष आहे.
सुस्थितीत वातवरणही अनुकूल आहे. असून भाजपात अतिक्रमण करु पाहणाऱ्या डोमकावळ्यांना थारा देवू नका, असे पोटतिडकीचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.
दरम्यान, श्री. लोढा यांच्या वक्तव्यामुळे भाजपांतर्गत चर्चेला उधाण आले असून, लोढांचा रोख नेमका कोणाकडे आहे ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. लोढा यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केल्याने कार्यकत्यांनी त्यांचा भाषणाला दाद दिली.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनीही मनपातील पक्षाचे नगरसेवक रोखठोक भूमिका मांडत नसल्याची खंत व्यक्त केली.
पंडीत दीनदयाळ परिवाराच्या वतीने शहर भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ऋग्वेद भवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी वसंत लोढा यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
यावेळी दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मुळे व अच्युत पिंगळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे,
ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, सदाशिव देवगावकर, संचालक निलेश लोढा आदींसह शहर कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. लोढा पुढे म्हणाले, नगरची अवस्था आज किती बिकट झाली आहे, हे सर्वांना दिसतच आहे. भाजपचा महापौर असताना व आताच्या शिवसेनेचा महापौर असताना महापालिकेची सत्ता कोण चालवत आहे? हे सांगण्याची गरज नाही. याचा मोठा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे.
आता हे चित्र बदलणे आवश्यक आहे. २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी पक्षाच्या कार्यकर्ते ध पदाधिकाऱ्यांनी कोणतीही दुहेरी निष्ठा न ठेवता एकनिष्ठेने भाजपच्याच उमेदवाराचे काम करावे.
जर पक्षाचा कोणी पदाधिकारी, कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका घेत काम करत असेल तर त्याला बाजूला करा, असे आवाहन केले.
अँड. आगरकर म्हणाले, शहरात भाजपाची ताकद पूर्वीपासूनच आहे. भाजपच्याच मोठ्या मदतीशिवाय तब्बल पाचवेळा शहरातून शिवसेनेचा आमदार होणे शक्यच नव्हते. आता येणारा काळ जरी संघर्षाचा असला तरी अनुकूल आहे.
आमदारकीचे स्वप्न साकार करायचे असेल तर सामूहिक प्रयतची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी पक्षाच्या पदाधिकायांनी व कार्यकत्यांनी निर्भीडपणे भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक परखडपणे आपली भूमिका मांडत नाहीत, ही मोठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले,