राजकारण

अहमदनगर जिल्ह्यातील खासदार स्पष्टच बोलले ! इंग्रजांनी दिलेले पाणी नगरच्या पुढाऱ्यांनी सोडले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : धरणे इंग्रजांनी बांधली. शेतकऱ्यांना पाणी दिले आणि नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५चा समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले; परंतु आता होणाऱ्या आंदोलनात मी सामील होणार असून

पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. पश्चिमेचे घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीच्या पाण्याचा हिशोब नाही, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृह येथू कमलाकर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख कोते यांनी बोलावलेल्या बैठकीत लोखंडे बोलत होते. ते म्हणाले गोदावरी, मुख्य, निळवंडे व भंडारदरा वा धरणांतील आवर्तनच शेतकऱ्यांसाठी कमी आहे.

त्यात जायकवाडी भागात ७ ते ८ आवर्तन देण्यासाठी नगर व नाशिकवर हा अन्याय कशाला? यासाठी लवकरच शेतकऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.

गोदावरी डावा व उजव्या कालव्याच्या चाऱ्याचे गुजरात पॅटर्ननुसार काम लवकरच केले जाणार आहे. गोदावरी कालव्यातून जायकवाडीला पाणी सोडले जाणार असल्यामुळे व निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे बंधारे व तलाव प्रशासकीय अधिकारी भरू देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी या बैठकीला जमा झाले होते.

शेतकऱ्यांनी २००५च्या कायदाचा व हा कायदा तयार करणाऱ्या नेत्यांचा घोषणा देत निषेध केला. हक्काचे पाणी बाहेर जात असल्याने शेतकऱ्यांच्या यावेळी तीव्र प्रतिक्रिया पहाववास मिळाल्या; परंतु मी शेतकऱ्यांबरोबर एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे, असे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, सुखलाल गांगवे,

राजेंद्र सोनवणे, सुरेश तरके, संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, वाकचौरे, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

तर अधिकाऱ्यांना धडा शिकवणार

निळवंडेच्या डाव्या कालव्यांवर अवलंबून असलेल्या केलवड, आडगाव, खडकेवाके, तळेगाव, चिंचोली, वाकडी, पिंपरी निर्मळ गावांतील तलाव व बंधारे, पूर्ण भरू न देता अधिकारी मुजोरी करत असल्याचा आरोप निळवडे समितीचे विठ्ठल घोरपडे यांनी केला. अधिकाऱ्यांची दादागिरी चालली तर अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने धडा शिकवणार असल्याचे बैठकीत शेतकरी म्हणाले.

निळवंडे कालव्यावरील तलाव व बंधारे भरून देणार

निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक यांची संयुक्त बैठक बोलावून टेलपासून संपूर्ण गावांतील तलाव व बंधारे भरून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office