अहमदनगर ते अहिल्यानगर अन आता पुन्हा…..; नामांतरणाचा वाद कायम, महापालिकेवर ‘अहिल्यानगर’ नाव खोडण्याची नामुष्की का आली ? वाचा….

अजूनही नगरच्या नामांतरणाचा वाद कायमचं आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी कॅबिनेटने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या आधी राज्य मंत्रिमंडळाने देखील अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिली होती.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Name Change

Ahmednagar Name Change : नगर शहरासह तालुक्याचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर असे झाले आहे. राज्य शासन स्तरावर आणि केंद्रीय शासन स्तरावर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर नगर शहर आणि जिल्ह्याच्या नामांतरणाचा हा विषय फार जुना आहे.

आपल्यापैकी अनेकांचा कदाचित जन्मही झाला नसावा तेव्हापासूनचा हा विषय. मात्र या विषयाला कोणीच हात घालायला तयार नव्हते. वर्तमान शिंदे सरकारने मात्र या विषयावर हात घातला आणि हा विषय मार्गी देखील लावलाय.

पण अजूनही नगरच्या नामांतरणाचा वाद कायमचं आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी कॅबिनेटने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या आधी राज्य मंत्रिमंडळाने देखील अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिली होती.

खरे तर, गतवर्षी अर्थातच 2023 मध्ये चौंडी येथे झालेल्या एका जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे केले जाईल अशी घोषणा केली होती. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने नगरचे नाव अहिल्या नगर करण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

पुढे हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी आला. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर नगर महापालिकेच्या जुन्या इमारतीवरील अहमदनगर हे नाव खोडून या भव्य वास्तूला अहिल्यानगर असे नाव देण्यात आले.

मात्र दोन दिवस महापालिकेवर अहिल्यानगर हे नाव झळकल्यानंतर लगेचच हे नाव खोडून टाकण्यात आले. अहिल्यानगर हे नाव पुसण्यात आले असल्याने पुन्हा एकदा महापालिकेवर अहमदनगर नाव झळकणार की काय अशा उलट सुलट चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या जुन्या इमारतीवर अहिल्यानगर नाव टाकल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली. आता, या तक्रारीनंतरच अहिल्यानगर नाव खोडून टाकण्यात आले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जोपर्यंत महसूल विभागाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत नाव बदलण्याची मुभा नसते, पण महापालिका प्रशासनाने महसूल विभागाचे अधिसूचना निघण्याआधीच नाव बदलण्याची घाई केली.

मात्र, आता अहिल्यानगर हे नाव खोडून टाकण्यात आले आहे. मात्र या निमित्ताने नगर शहरासह तालुका आणि जिल्ह्याचे नाव नेमके अहमदनगर की अहिल्यानगर याबाबतचा गदारोळ अजूनही सुरूच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe