महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि
लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा, त्यांची कामे जलद आणि सुलभ व्हावीत, यासाठी महसूल पंधरवड्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवले जातील, असे विखे यांनी सांगितले.
• १ ऑगस्ट – महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. पहिल्या दिवशी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जदारांना लागणारी सर्व कागदपत्रे दिली जातील.
२ ऑगस्ट- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना.
•३ ऑगस्ट – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना.
• ४ ऑगस्ट – स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय.
•५ ऑगस्ट – कृषी मार्गदर्शन कार्यक्रम.
६ ऑगस्ट – शेती, पाऊस आणि दाखले देणार. झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेऊन विविध दाखले वाटप.
७ ऑगस्ट – युवा संवाद उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण आणि रोजगाराच्या अनुषंगाने विविध दाखल्यांचे वाटप.
• ८ ऑगस्ट – महसूल जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत महसूल विभागातील विविध प्रकरणे, अपील, सलोखा योजनेतील प्रकरणे, जमिनीविषयक खटले निकाली काढणार.
• ९ ऑगस्ट – महसूल ई-प्रणाली उपक्रमातून ऑनलाइन प्रणालीच्या बाबतीत जनजागृती करून ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावरील प्राप्त तक्रारी निकाली काढणार.
१० ऑगस्ट सैनिक हो – तुमच्यासाठी उपक्रमातून सैनिकांच्या बाबतीतील सर्व जमिनीची प्रकरणे आणि दाखले वाटप.
११ ऑगस्ट – आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन करून जनजागृती करणार.
१२ ऑगस्ट ‘एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा’ राज्याच्या वतीने दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रमाची माहिती देणार.
१३ ऑगस्ट – महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद आणि प्रशिक्षण शिबीर राबवले जाऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडवणार.
१४ ऑगस्ट – जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पंधरवड्यातील माहिती माध्यमांना दिली जाणार.
१५ ऑगस्ट संवर्गातील कार्यरत, निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद.