Ahmednagar Politics : आ.राम शिंदेंनी पुन्हा विखे कुटुंबाविरोधात दंड थोपटले, आमदारकीला पुन्हा विखेंना नडणार? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
shinde vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदार संघाची निवडणूक विरोधकांनी जेवढी गाजवली तितकीच भाजपमधीलच अंतर्गत वादामुळे जास्त गाजली. भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांना सुरवातीपासूनच भाजपमधील आ. राम शिंदे यांनी आवाहन दिले होते.

त्यांची नाराजगी विखेंसाठी मोठे आवाहन होते. त्यावेळी आमदार राम शिंदे यांची नाराजी काढताना विखे पिता-पुत्रांच्या नाकीनऊ आले होते. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी मध्यस्ती करावी लागली होती. त्यानंतर शिंदे यांनी विखे यांच्यासोबत जुळवून घेत काम केले.

परंतु आता लोकसभेची निवडणूक संपताच पुन्हा एकदा राम शिंदे यांनी विखे कुटुंबाविरोधात दंड थोपटल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी अर्थात शिक्षक आमदार साठी भाजपमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे हे दोघे इच्छुक आहेत.

परंतु राम शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचेही नाव पुढे केले आहे. शिंदे म्हणाले, बेरड नेहमीच इच्छुक असतात, पण पुढे काहीच होत नाही.

मी त्यांना कालपासून विचार करा म्हणून सांगतोय; पण ते नाही म्हणतात, अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यामुळे एकनिष्ठ बेरड यांना शिक्षक मतदारसंघातून संधी मिळणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

विखे, कोल्हेंसह बेरडही इच्छुक
नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपमधून राजेंद्र विखे व विवेक कोल्हे हे दोघे इच्छुक आहेत. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे राम शिंदेंनी सांगितले. भानुदास बेरड यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले, बेरड नेहमीच इच्छुक होतात, पण पुढे काहीच होत नाही. मी त्यांना कालपासून विचार करा म्हणून सांगतोय, पण ते नाही म्हणतात, अशी मिश्किल टिप्पणी शिंदे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News