राजकारण

Ahmednagar Politics : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावर आरोप करणे म्हणजे स्वतःची राजकीय उंची…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : स्वतःचा व स्वतःच्या नेत्यांचा नाकर्तेपणा झाकुन तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झगडणाऱ्या माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावर आरोप करणे व त्यांच्यावर टिका करुन स्वतःची राजकीय उंची वाढविण्याचा केवीलवाणा प्रयत्न महाआघाडीचे तालुक्यातील नेते नेहमी करत असतात.

परंतु या प्रयत्नात स्वतः किती रसातळाला गेले आहेत हे बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने तालुक्यातील जनतेने यांना दाखवुन दिले आहे. आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही महाआघाडीचे पानिपत करुन त्यांना घरी बसवु असा हल्लाबोल कर्डिले समर्थकांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सूळ, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, दादासाहेब दरेकर, संतोष भापकर, अशोक झरेकर, दिपक कार्ले, गुलाबराव कार्ले, संतोष म्हस्के, बबन हराळ, सतिश चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कर्डिले समर्थकांनी संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांच्यासह महाआघाडीच्या नेत्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. महाआघाडीच्या तथाकथीत नेते मंडळींनी परवा घोसपुरी पाणी योजने संदर्भात स्वतःची बाजु सावरण्यासाठी आणि स्वतःचा नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यासाठी नेहमीप्रमाणे माजी मंत्री कर्डिले यांच्यावर टिका टिप्पणी व बेछूट आरोप करत स्वतःची राजकीय उंची वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

१९९५ साली युती सरकारच्या काळात कर्डिले यांनी मंत्रिपद नाकारुन दुष्काळी तालुक्याला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने बुऱ्हाणनगर व घोसपुरी प्रादेशीक पाणी पुरवठा योजना मंजुर केल्या होत्या. सदर योजना मंजुर करतांना मायबहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरावा व पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा हा प्रामाणिक हेतु ठेवून या योजनांसाठी कर्डिले यांनी प्रयत्न ची पराकाष्ठा केली होती.

आजही नगर तालुका तीन मतदारसंघात विभागलेला असतांना तालुक्याचे विविध प्रश्न अडीअडचणी संदर्भात कर्डिले सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करतात. त्याचाच परिपाक म्हणून साकळाई उपसा सिंचन योजने संदर्भात खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, यांच्यासह सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे तिन महिन्याच्या आत या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध होवुन प्रत्यक्ष सर्वेक्षणालाही सुरुवात झाली.

लवकरच ही योजना मार्गी लागेल, परंतु केवळ विधानसभा निवडणुक डोळयासमोर ठेवून २० वर्षांपूर्वी ज्या गाडे सरांनी नगर ते मुंबई साकळाई संदर्भात पायी मोर्चा काढला त्याच गाडे सरांनी किंवा त्यांच्या तथाकथीत महाआघाडीच्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर साकळाई योजनेच्या मंजुरी संदर्भात साधे निवेदन किंवा पत्रही दिले नाही किंवा ब्र शब्दही काढला नाही. यातच त्यांची निष्क्रियता दिसत असल्याचे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office