नात्यागोत्यामुळे कार्यकर्ते त्रस्त, आता तुम्ही परत आमदार नाहीत ! मोनिका राजळेंना भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांनी स्पष्टच सुनावलं..

विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधीच राजकीय क्लेष वाढू लागले आहेत. महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्याने तिकीट एकालाच बाकीचे मात्र नाराज होतील अशी स्थिती आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधीच राजकीय क्लेष वाढू लागले आहेत. महायुतीत असो किंवा महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असल्याने तिकीट एकालाच बाकीचे मात्र नाराज होतील अशी स्थिती आहे.

त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदार संघातील भाजपची स्थिती बिकट झाली आहे. आ. राजळेंविरोधात भाजप मधीलच नेते एकवटले आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. आता तर लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत.

नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठवला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही,

असा इशाराच भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी दिलाय. मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे झाला. यावेळी त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या.

काय म्हणाले मुंडे?
जनतेसाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे उद्योग मतदारसंघातील प्रस्थापित करत आहेत. नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठवला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याची दखल पक्षालाही घ्यावी लागेल. लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत.

ज्यांची गल्लीत निवडून येण्याची ऐपत नाही अशांना तालुका सांभाळायला दिला आहे. त्यांना विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. त्यामुळे तुम्ही परत आमदार होणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

अपक्ष उभे राहण्याचीही आमची तयारी
भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी देखील दंड थोपटले.

त्यांनी सांगितले की, आम्ही २५ ते ३० वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहत काम करत आहोत. त्यामुळे उमेदवारी आम्ही मागतो तो आमचा अधिकार आहे.

त्यामुळे आता पक्षाने आदेश दिला तर उमेदवारी अन्यथा अपक्ष उभे राहून लढा देऊ असे स्पष्ट बोल त्यांनी सुनावले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe