Ahmednagar Politics : अजित पवार गट आमदारकीला अहमदनगरमध्ये ‘या’ जागेंवर लढणार, घुले-नागवडेंसह ‘या’ मातब्बरांना संधी नाही? पहा..

Pragati
Published:
ajit pawar

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. लोकसभेत आलेल्या अपयशामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आता आगमी नियोजनास तयारीस लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही मोठे संघटन उभारण्यास तयारी सुरु झाली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यापध्दतीने बैठका घेण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान त्यांनी काल (१८ जून) नगर येथे पक्षाच्या कार्यकर्ता आढावा मेळाव्यात अहमदनगरमधील जागांविषयी भाष्य केले. कोणत्या जागेंवर लढणार याविषयी मत व्यक्त केले.

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ?
राष्ट्रवादीला, महायुतीला राज्यात प्रचंड यश मिळेल. नगर जिल्ह्यातील मागील वेळी लढविलेल्या सर्व जागा यावेळीही लढविणार असल्याचा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

याचाच अर्थ मागील वेळी राष्ट्रवादीच्या कर्जत-जामखेड, पारनेर, नगर शहर, अकोले, राहुरी, कोपरगाव या सहा जागा होत्या. आता तटकरे यांच्या वक्तव्यातील ‘मागील वेळी लढविलेल्या सर्व जागा’ याचा अर्थ जर पहिला तर या सहा जागेंवर राष्ट्रवादी पुन्हा लढेल असे दिसते.

घुले-नागवडेंचे काय?
जर तटकरे यांच्या म्हणण्यानुसार ‘मागील वेळी लढविलेल्या सर्व जागा’ म्हणजे कर्जत-जामखेड, पारनेर, नगर शहर, अकोले, राहुरी, कोपरगाव या सहा जागा राष्ट्रवादीने लढवल्या तर मग शेवगाव मधून अजित पवार गटासोबत असणारे चंद्रशेखर घुले पाटील असतील किंवा श्रीगोंदेतील अनुराधा नागवडे असतील त्यांचे काय? त्यांनी देखील आमदारकीची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यामुळे वरील सहा जागा राष्ट्रवादी लढवणार असेल तर मग घुले-नागवडेंना संधी मिळणार नाही का? असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

नागवडेंनी केली उमेदवारी जाहीर
अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंद्याचा आमदार नागवडे कुटुंबातील असेल, असे सांगून एकप्रकारे विधानसभेची उमेदवारीच जाहीर केली. एवढेच नव्हे, तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यात श्रीगोंद्याचा खारीचा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तटकरे यांचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापाठोपाठ अजित पवार गटाने अहमदनगर शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंगळवारी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा वर्धापनदिन नगर शहरात साजरा झाला.

यानिमित्त झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्धार केला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नगर शहरातून केली. योवळी लोकसभेच्या निवडणुकीत मताधिक्य दिले म्हणून गाफील राहू नका.

पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भाव ठेवून काम करा, अशा शब्दांत तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. विरोधकांनी केलेल्या चुकीच्या प्रचारामुळे दूर गेलेल्या अल्पसंख्याक, आदिवासींसह सर्व घटकांना सोबत घेऊन विधानसभेला सामोरे जायचे आहे. चैतन्य, आत्मविश्वास आणि स्फूर्ती घेऊन आपल्याला लढायचं आहे. त्यासाठी पुढील तीन महिने पक्षासाठी काम करा असे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe